शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सात धरणांची पातळी घटली

By admin | Updated: April 18, 2016 00:36 IST

गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांमध्ये केवळ ५९ टक्केच पाणी जमा झाले होते. त्यातच आता उन्हाची दाहकता अधिक प्रमाणात वाढली आहे. या एकत्रित

- आविष्कार देसाई, अलिबाग

गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या धरणांमध्ये केवळ ५९ टक्केच पाणी जमा झाले होते. त्यातच आता उन्हाची दाहकता अधिक प्रमाणात वाढली आहे. या एकत्रित परिणामामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये २३.७४६ द.ल.घ.मी (दशलक्ष घनमीटर) पाणी शिल्लक आहे. कोथुर्डे, रानिवली, आंबेघर, पुनाडे, खैरे, वरंध आणि साळोखे या सात धरणांमध्ये ४ ते १९ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना या धरणातून पाणी खरवडून घेण्याची वेळ आली आहे.रायगड जिल्ह्यामध्ये लघुपाटबंधारे विभागांतर्गत २८ धरणांचा समावेश होतो. या सर्व धरणांची एकत्रित साठवण क्षमता ही ७१.५७५ द.ल.घ.मी. आहे. ६८.२८६ द.ल.घ.मी. एवढा पाणीसाठा वापरण्याजोगा आहे. कमी पडलेला पाऊस आणि वातावरणात वाढलेल्या उष्णता आणि धरणातील न काढलेल्या गाळामुळे पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. या धरणांच्या माध्यमातून पिण्याबरोबरच उन्हाळी शेतीसाठीही पाण्याचा वापर केला जातो. नजीकच्या कालावधीमध्ये धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घसरण होणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच उन्हाळी शेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवणार आहे. या परिसरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होणार आहेत. पाणीसंकटातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आधीच एक हजार ८६६ गाव-वाड्यांसाठी सात कोटी ८८ लाख रुपयांच्या टंचाई कृती आराखड्याचे नियोजन केले आहे. मात्र प्रशासनाची ही उपाययोजना म्हणजे तात्पुरती असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे राजन भगत यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध ठिकाणी अस्तित्वात असणाऱ्या डोंगरांवरील कॅचिंग पॉइंटवर प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जेणेकरुन कॅचिंग पॉइंटवरील पाण्याचे योग्य नियोजन करून परिसरातील नद्यांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. तसेच त्या नद्यांवर छोटी धरणे बांधणे गरजेचे असल्याचेही भगत यांनी स्पष्ट केले.यंदा मान्सून लवकर दाखल होणार असतानाच ‘तो जमके बरसणार’ असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. परंतु एप्रिल महिन्याचे १५ दिवस आणि संपूर्ण मे महिना अद्याप शिल्लक आहे. पाण्याचे गणित १ दशलक्ष घनमीटर म्हणजे १० लाख क्युबिक मीटर, १ क्युबिक मीटर म्हणजे १००० लिटर. २८ धरणांमध्ये २३.७४६ दलघमीप्रमाणे २ कोटी ३७ लाख ४६ हजार दलघमी पाणी आहे. याचाच अर्थ म्हणजे २३ अब्ज ७४ कोटी ६० लाख लिटर पाणी शिल्लक आहे. परंतु धरणाची साठवण क्षमता ही ६८.२८६ दलघमी आहे. यातील तफावत ही ४४.५४ दलघमीची आहे. म्हणजेच ४४ अब्ज ५४ कोटी लिटर धरणाच्या पाणीसाठ्यात पाण्याच्या नावाने ठणठण आहे.पाण्याची स्थिती२०१५ साली याच तारखेला ३२.४२५ दलघमी पाणी शिल्लक होते, तर २०१४- ३३.५३९ दलघमी, २०१३- ३०.३४६, २०१२-३०.५९८ दलघमी आणि २०११ साली ३४.५६६ दलघमी पाणी शिल्लक होते.पाणी जपून वापरण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. नागरिकांनीही पाणी वापरायचे योग्य नियोजन न केल्यास नागरिकांचे पाण्यासाठी हाल होणार आहेत.