शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळ्यात बिबट्याचा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:40 IST

नेवरुळ गावात बैलाला केले ठार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

म्हसळा : तालुक्यातील जंगल भागात बिबट्यांंचा संचार आहे. हे बिबटे गाव परिसरात चारा खाण्यासाठी गेलेल्या पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार मारण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बुधवार, ३० जानेवारी रोजी नेवरुळ येथील महिला शेतकरी लीला हरी पगार यांच्या मालकीचा बैल गावालगतच जंगल भागात चरण्यासाठी गेला असता त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. यामुळे नेवरुळ गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यापासून ३0 किलोमीटर अंतरावर जंगल आहे. त्यामुळे अनेक वेळा जंगली प्राणी लोकवस्तीत येतात. यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी होण्याचे आणि गोधनाचे नुकसान झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे. त्यामुळे सातत्याने घडणाऱ्या या घटनांकडे वनविभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तर ३० जानेवारीला बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याने लीला पगार यांनी म्हसळा वनविभागाकडे लेखी तक्रार करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी वनक्षेत्रपाल एन.डी.पाटील यांच्याकडे लेखी अर्ज केला आहे. घटनास्थळी जाऊन म्हसळा येथील वनपाल सुधाकर थळे आणि वनरक्षक बनसोडे यांनी पंचनामा के ला आहे.पशुधनाचे नुकसानदरवर्षी म्हसळा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार ते पाच पशुधनाचे नुकसान होत असल्याची नोंद म्हसळा वनविभाग कार्यालयात होते. १ एप्रिल २०१४ ते ४ डिसेंबर २०१८ पर्यंत वनविभाग म्हसळा हद्दीत पशुधनाच्या आॅनलाइन नुकसानीच्या १४ घटना घडल्या आहेत तर आॅफलाइनच्या १५ पैकी १४ गोधनाचे नुकसानीचे म्हसळा वनविभागाचे माध्यमातून योग्य तो वैद्यकीय पंचनामा व तपासणी करण्यात आली आहे. संबंधित शेतकºयांना त्यांच्या पशुधनाची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. बिबट्याच्या हल्लात गंभीर जखमी केलेल्या शेतकºयाला म्हसळा वनविभागाच्या माध्यमातून एक लाख रु पयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

टॅग्स :leopardबिबट्या