शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानच्या जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:26 IST

माथेरान या पर्यटनस्थळी नेरळजवळील उल्हासनदीमधून पाणी उचलून जलवाहिनीच्या माध्यमातून नेले जाते.

कांता हाबळे नेरळ : माथेरान या पर्यटनस्थळी नेरळजवळील उल्हासनदीमधून पाणी उचलून जलवाहिनीच्या माध्यमातून नेले जाते. ती जलवाहिनी गेल्या १५ दिवसांपासून फुटली असून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे लक्ष नसल्याने कालव्यासारखे पाणी नेरळच्या हुतात्मा चौकातून वाहत आहे. या पाण्याच्या प्रवाहामुळे नेरळ येथील हुतात्मा चौकातील उद्यानाची माती देखील मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. दरम्यान, ही पाणीगळती अशीच सुरू राहिल्यास माथेरानला जाणारे पाणी कमी प्रमाणात पोहचले जाईल आणि दुसरीकडे नेरळ हुतात्मा चौकातील उद्यानाची दुरवस्था होण्याची शक्यता आहे.माथेरानला पाणीपुरवठा करणारी अशुद्ध पाण्याची जलवाहिनी उल्हासनदी येथून कुंभे गावातून कर्जत-कल्याण रस्त्याने नेरळच्या हुतात्मा चौक येथे येते. त्यानंतर ती जलवाहिनी नेरळ-माथेरान घाटरस्त्याच्या कडेने माथेरानला जाते. या जलवाहिनीला नेरळच्या हुतात्मा चौकात मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे तेथे दिवसभर पाण्याचा प्रवाह वाहत असून ते पाणी रस्त्याच्या मधून वाहत जाऊन रस्त्याचे डांबर निघत आहे. त्यात माथेरानच्या जलवाहिनीमधून दिवसातील २४ तासातील १८ तास पाणी उचलले जाते. त्यामुळे त्या जलवाहिनीमधून सतत पाण्याचा प्रवाह सुरू असतो. तो पाण्याचा प्रवाह जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे सतत वाहत आहे. त्याचवेळी रस्त्याच्या मधूनच पाण्याचा प्रवाह वाहत जात असल्याने रस्त्यावर हिरवे शेवाळ तयार झाले असून रस्ता देखील चिकट होऊ लागला आहे. त्यात या जलवाहिनीवर ताबा असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि माथेरान गिरीस्थान नगरपरिषद यांना पाणीगळतीबद्दल माहिती देऊन देखील कोणतीही कार्यवाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आली नाही.या सर्व पाण्याच्या प्रवाहामुळे एकाच वेळी नेरळ-माथेरान घाटरस्त्याचा सुरुवातीचा भाग आणि कर्जत-कल्याण रस्त्यावर नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्याची स्थिती नाजूक बनली आहे. कारण रस्त्यावरून पाणी कालव्यासारखे सतत जात असल्याने रस्ता खराब झाला आहे. दुसरीकडे नेरळ गावाची शान असलेल्या हुतात्मा चौकातील उद्यानामधून तो पाण्याचा प्रवाह जात असल्याने हुतात्मा चौकातील उद्यानाची अवस्था देखील नाजूक बनली आहे. हुतात्मा स्मारक समितीकडून देखील त्या पाणीगळतीबाबत माथेरान नगरपरिषदेला कळविण्यात आले आहे, परंतु त्यांच्याकडून देखील कोणतीही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे माथेरानच्या प्रवेशद्वारावरील पर्यटकांना आकर्षित करणारे हुतात्मा स्मारकमधील उद्यानाला निर्माण झालेला धोका याबद्दल नेरळ ग्रामपंचायतीने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नेरळ गावाचे प्रेरणास्थान बनलेली ही वास्तू माथेरान नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेमुळे धोका निर्माण झाला आहे.।माथेरान नळपाणी योजनेची नेरळच्या हुतात्मा चौकातील फॉरेस्ट चौकी येथील पाणीगळतीबद्दल कर्मचाऱ्यांना सूचित केले आहे. त्याचवेळी अन्य कुठेही जलवाहिनी फुटून पाणीगळती होत असेल तर त्यावर देखील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- किरण शानबाग, शाखा अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणहुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष यांच्याकडून माथेरान नगरपरिषदेला याबाबत कळविले आहे. हुतात्मा चौक आणि स्मारक हे नेरळ गावाचे भूषण असून ते आमच्या सर्वांचे स्फूर्तिस्थान आहे.त्यामुळे तेथील वास्तूची दुरवस्था माथेरान जलवाहिनीमुळे होणार असेल तर ते चुकीचे आहे. कल्पना देऊनदेखील कोणी लक्ष देणार नसेल तर मात्र आम्ही शांत बसणार नाही.- अंकुश शेळके, उपसरपंच, नेरळ