शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सोगाव येथील बालग्राममध्ये ‘नो चाइल्ड अलोन’ मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:12 IST

सन १९६४ मध्ये निराधार मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या एसओएस या आंतरराष्ट्रीय संस्थेने १५ मे या आंतरराष्ट्रीय कुटुंबदिनानिमित्त ‘नो चाइल्ड अलोन’ या जागतिक मोहिमेचा शुभारंभ केला आहे.

- जयंत धुळपअलिबाग : सन १९६४ मध्ये निराधार मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या एसओएस या आंतरराष्ट्रीय संस्थेने १५ मे या आंतरराष्ट्रीय कुटुंबदिनानिमित्त ‘नो चाइल्ड अलोन’ या जागतिक मोहिमेचा शुभारंभ केला आहे. भारतातील एसओएस इंडिया या संस्थेच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे कार्यरत एसओएस बालग्रामच्या वतीने देखील ‘नो चाइल्ड अलोन’ या मोहिमेचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला.भारतातील निराधार पालकहीन मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्याची नितांत गरज आहे. काळाची गरज म्हणून एसओएस इंडिया या सामाजिक संस्थेने ‘नो चाइल्ड अलोन’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन एसओएस इंडिया या सामाजिक संस्थेचे सजिण अनुजा बन्सल यांनी केले आहे.भारतातील दोन कोटी निराधार मुलांच्या अडचणी जगासमोर आणण्यासाठी व एसओएसमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा यासाठी ही मोहीम समर्पित आहे. या २ कोटी मुलांची पुरेशी काळजी घेतली जात नाही. कारण त्यांनी आपले दोन्ही किंवा एक पालक गमावले आहेत किंवा पालक या मुलांचे पालन पोषण करण्यास सक्षम नाहीत. अशा कुटुंबाचे सक्षमीकरण नाही झाले आणि या मुलांना पुरेशी काळजी किंवा देखभाल सेवा मिळाली नाही तर ही संख्या २०२१ पर्यंत ४ कोटी एवढ्या भयंकर प्रमाणात वाढण्याची शक्यता विचारात घेऊन ‘नो चाइल्ड अलोन’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.एसओएस सध्या ४४० कुटुंबे तसेच २६ हजार मुलांसाठी संस्थेच्या कौटुंबिक वातावरणात मुलांची काळजी कार्यक्र म व कुटुंब सक्षमीकरण कार्यक्र माच्या माध्यमातून सेवा देत आहे. एसओएस बालग्राम सोगाव अलिबाग येथे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्यात येत आहे. ‘कुटुंब आणि पर्यावरण’ हा यावर्षीचा कुटुंब दिनाचा विषय आहे. या कार्यक्र माच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना मुलांचे आरोग्य, शिक्षण, मूल्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एसओएस संस्था पालकदिन, निराधार मुलांची काळजी व देखभाल यासाठी कार्यरत असल्याचे अनुजा बन्सल यांनी सांगीतले.सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यकसंयुक्त राष्ट्राच्या बालहक्क परिषदेनुसार मुलांच्या योग्य वाढीसाठी कुटुंब हेच उत्तम ठिकाण आहे. कुटुंबामध्येच मुलांना प्रेम, काळजी, संरक्षण मिळू शकते. भारतातील या निराधार पालकहीन मुलांना कौटुंबिक आधार मिळवून देण्याची गरज आहे.काळाची गरज म्हणून एसओएस इंडिया या सामाजिक संस्थेने नो चाइल्ड अलोन ही मोहीम राबविली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ८५८६९९६६९९ याक्र मांकावर मिसकॉल देऊन आपला सहभाग नागरिक नोंदवू शकतात.

टॅग्स :Raigadरायगड