शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण गणेश मंदिराचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 02:47 IST

संपूर्ण रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराचे महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास निधीतून एक कोटी रुपये निधी खर्चून सुरू केलेले बांधकाम आता पूर्णत्वास येत आहे.

बोर्ली पंचतन : संपूर्ण रायगड जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिराचे महाराष्ट्र शासनाने पर्यटन विकास निधीतून एक कोटी रुपये निधी खर्चून सुरू केलेले बांधकाम आता पूर्णत्वास येत आहे. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टीने काम प्रगतिपथावर आहे, तसेच सध्या गणेश मंदिरातील असलेल्या पुरातन शिवकालीन गणेशाच्या मूर्तीवर वज्रलेप आणि मूर्तीची पुनर्स्थापना कार्यक्र म २४ ते २६ मार्चअखेर करण्यात येणार असून मंदिराच्या कलशारोहण देखील यावेळी श्री गणपती देव व पूजेची नेमणूक ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच चोरीस गेलेल्या सुवर्ण गणेशाच्या मुखवट्याचे सोने लवकरच शासनाकडून गणपती ट्रस्टकडे मिळणार असून या सोन्याची नवीन मूर्ती घडवून सुवर्ण गणेशाचे देखील पुढील कालावधीत पुनर्स्थापना होईल, असा विश्वास ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर यांनी व्यक्त केला.दिवेआगर सुवर्ण गणेशमंदिरातील मूळ गणेश मूर्ती पुरातन असून यापूर्वी या मूर्तीची प्रतिष्ठापना अंदाजे १८६५ सालादरम्यान करण्यात आली होती. तिथपासून या मूर्तीवर अभिषेक व पूजा केल्याने शेंदुराचे थर चढले होते यासाठी या मूर्तीवर शास्त्रोक्त पद्धतीने संस्कार करून या मूर्तीवर वज्रलेप व त्याच मूर्तीची पुनर्स्थापना करण्याचा कार्यक्र म २४ ते २६ मार्चअखेर करण्यात येणार आहे. मूर्तीच्या सिंहासनाचे काम सुरू असल्याने मंदिर दर्शनासाठी १९ ते २६ मार्चअखेर बंद ठेवण्यात आले आहे. शनिवार २४ मार्च रोजी सकाळी १० वा. उदकशांती, ५ वा. होमहवन, रविवार २५ मार्च रोजी सकाळी ८ वा. शांतीहोम, सकाळी १०वा. वास्तुशांती व जलाधिवास, दुपारी ४ वा. कळस मिरवणूक, सोमवार २६ मार्च रोजी सकाळी ९वा. कलशारोहण, सकाळी ११ वा.मूर्ती पुनर्स्थापना व त्यानंतर महाआरती व प्रसाद असे कार्यक्र म होणार आहेत.१सुवर्ण गणेश मंदिराचे बांधकाम महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास निधीतून एक कोटी रुपये खर्चून करण्यात येत आहे. २०१४ पासून हे बांधकाम सुरू असून मंदिराच्या आतील गाभाऱ्याचे काही प्रमाणात तसेच वीज जोडणी, सीसीटीव्ही कॅमेरा व मंदिराची रंगरंगोटी अशी कामे शिल्लक आहेत.२या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्णत्वास येणार असल्याचे चित्र आहे. तसेच मंदिरातील सुवर्ण गणेशाच्या दरोड्यामध्ये चोरीस गेलेल्या सुवर्ण गणेश मुखवट्याचे सोने आता गणपती देव आणि पूजेची नेमणूक ट्रस्ट यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी मुख्यमंत्री व गृहखात्याकडून चौकशी पूर्ण झाली आहे. लवकरच सोने ट्रस्टकडे देण्याबाबत शासन अनुकूल असल्याची माहिती गणपती ट्रस्टचे अध्यक्ष महेश पिळणकर यांनी दिली.३त्यादृष्टीने सोने ट्रस्टच्या ताब्यात मिळाल्यानंतर लगेचच सुवर्ण गणेशाची पुनर्स्थापना देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे निश्चितपणे दिवेआगर पर्यायाने श्रीवर्धन पर्यटनाच्या बाबत उंच भरारी घेईल असा विश्वास पिळणकर यांनी व्यक्त केला.४सुवर्ण गणेशमूर्ती श्री गणपती देव आणि पूजेची नेमणूक ट्रस्ट यांच्या अधिपत्याखाली देखभाल करण्यात येत असे व आता आॅगस्ट २०१७ पासून नव्याने कार्यभार हाती घेतलेल्या ट्रस्टचे काम ग्रामस्थांच्या सहकार्यातून समाधानकारक सुरू असल्याने समस्त दिवेआगर सहित श्रीवर्धनकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

टॅग्स :Raigadरायगड