शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादन : महाडमध्ये दलालांचा सुळसुळाट, शेतक-यांची अडवणूक, मोबदला वाटपामध्ये गैरप्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 03:25 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यास महाडमध्ये विलंब होत असल्याने लाभार्थी शेतकºयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून त्याचा उद्रेक होण्याचे संकेत मिळत आहेत.

संदीप जाधव महाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यास महाडमध्ये विलंब होत असल्याने लाभार्थी शेतकºयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून त्याचा उद्रेक होण्याचे संकेत मिळत आहेत. संपादित जमिनीचे कागदपत्र व्यवस्थित असतानाही लाभार्थी शेतकºयांना मोबदला देण्यास महाड प्रांताधिकारी कार्यालयाकडून अडवणूक केली जात असल्याची बाब उघडकीस येत आहे. या मोबदला वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचे आरोप केले जात असून मिळणाºया मोबदल्यातून दलालांमार्फत महसूल अधिकाºयांकडून टक्केवारीची देखील अटकळ घातली जात असल्याची चर्चा महाडमध्ये उघडपणे केली जात आहे.महामार्गावरील वीर ते भोगाव खुर्द या ४६ कि.मी. च्या मार्गासाठी भूसंपादन व मोबदला वाटपाचे काम महाड प्रांताधिकारी यांच्याकडे असून या २१ गावांच्या हद्दीतील शेतकºयांकडून या संपादनाबाबत ६७० हरकती प्रांताधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत या हरकतींवर कुठलाही निर्णय दिला जात नसल्यामुळे हरकतदार शेतकरी सध्या प्रांताधिकारी कार्यालयात खेटा मारताना दिसत आहेत. यापैकी काही तक्र ारी या महसूल कर्मचाºयांना हाताशी धरून दलालांमार्फत करण्यात आल्याची माहिती उजेडात येत आहे. महाड शहरालगतच्या करंजखोल येथील बहुतांश शेतकºयांचे जमिनींचे कागदपत्र असूनही या गावांतील एकाही लाभार्थाला अद्यापही मोबदला मिळालेला नाही. दोन दिवसांपूर्वी या शेतकºयांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांची भेट घेवून जमिनीचा मोबदला त्वरित देण्याची मागणी केली होती. येत्या काही दिवसांत मोबदला मिळाला नाही तर उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.