शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांच्या रोषणाईत लक्ष्मीपूजन, झेंडूच्या फुलांच्या तोरणमाळा अन् सप्तरंगी रांगोळ्यांनी सजले अंगण

By निखिल म्हात्रे | Updated: November 12, 2023 20:51 IST

घरोघरी आणि दुकानात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. 

अलिबाग - झेंडूच्या फुलांच्या तोरणमाळा, सप्तरंगी रांगोळ्यांनी सजलेले अंगण आणि लक्ष लक्ष दिव्यांच्या झगमगाटात व फटाक्‍यांच्या आतषबाजीत रविवारी सायंकाळी मुहूर्तावर शहरासह जिल्ह्यात लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले. यासह व्यापाऱ्यांनी चोपडी पूजन केले. दिवाळीच्या दिवशीही सायंकाळपर्यंत बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली होती. घरोघरी आणि दुकानात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. 

रविवारी सायंकाळी सहा ते रात्री 8.33 पर्यंत लक्ष्मीपूजन नागरिकांनी केले. मंदीचे संकट दूर होत समृद्धी येऊ दे, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली. दुकानांच्या व्यवहारासाठी असलेल्या नव्या हिशेब वही खात्यांचे (चोपड्यांचे) पूजन करण्यात आले. मिणमिणत्या पणत्या, रांगोळ्या व फुलांच्या सुगंधात शहर आणि परिसरात लक्ष्मीपूजन सोहळा मंगलमय वातावरणात उत्साहात झाला. लक्ष्मीपूजन असल्याने पहाटेपासूनच वातावरणात मांगल्य आणि उत्साहाचा सुगंध दरवळत होता. घरासमोर सडा टाकत आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या. लक्ष्मीपूजन व नागरिकांनी लक्ष्मीची चित्र असलेली लाल रंगाच्या वहीचे पूजन केले. त्यानंतर व्यापारी, तसेच नागरिकांनी हरित फटाके फोडले. फटाक्‍यांच्या आतषबाजीने सारा आसमंत प्रकाशमय झाला होता. खरेदीसाठी गर्दी लक्ष्मीपूजनासाठी लागणारी झेंडूची फुले, केरसुणी, तसेच नैवेद्यासाठी मिठाई, लाह्या बत्तासे, पूजेसाठी लागणारे वेगवेगळे वाण खरेदीसाठी कालपासूनच ग्राहकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती.

लक्ष्मी पूजनाच्या तयारीसाठी महिलांनी घरासमोरील मोकळ्या जागेत आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. लक्ष्मीपूजनात केरसुणी पूजेला महत्त्व आहे. त्यासाठी नवीन आणलेली केरसुणी पूजेसाठी ठेवण्यात आली होती. मंगल कलश, लक्ष्मीची प्रतिमा व त्यापुढे केरसुणी ठेवण्यात आलेली होती. झेंडूच्या फुलांच्या माळा व आकर्षक रोषणाईमुळे परिसरात मंगलमय वातावरण तयार झाले होते. व्यापाऱ्यांनी गादी मुर्हुतावर सरस्वती, लक्ष्मी पूजन, कुबरेची पूजा केली. पारंपरिक पद्धतीने अमावस्येच्या दिवशी येणारे फल लक्ष्मी आणि स्थिर लक्ष्मी राहावी यासाठी पूजा करण्यात येते. पुजेच्या वेळी दाग-दागिणे ठेऊन त्यांची पुजन केले. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2023