शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खालापुरात लाखांची गावठी दारू नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:12 IST

खालापूर पोलिसांना इरशाळ गडाच्या पायथ्याशी इरशाळवाडीत विनापरवाना गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहोपाडा : तालुक्यातील दुर्गम भागात चालत असलेल्या हातभट्टीविरोधात खालापूर पोलीस निरीक्षक विश्वजीत कार्इंगडे यांनी मोहीम उघडली असून जवळपास लाखाची गावठी दारू नष्ट करीत १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

खालापूर पोलिसांना इरशाळ गडाच्या पायथ्याशी इरशाळवाडीत विनापरवाना गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील आणि पोलीस निरीक्षक विश्वजीत कार्इंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रसाद पाटील, खंडागळे, रूपनवर यांनी साध्या वेशात छापा टाकला असता, पाच व्यक्ती दारूच्या भट्टी लावून दारू तयार करताना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ८२,६०० रु पये किमतीचा गावठी दारूचा माल जप्त केला आहे. तसेच पळून गेलेल्या पाच व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.

दुसरा छापा बोरीमाळ ठाकूरवाडी येथे टाकून एकूण १२,१०० रुपये किमतीचे गावठी दारू तयार करण्याचे साहित्य जप्त के ले. हातभट्टीची तयार दारू व दारू गाळण्याचे साहित्य भांडी, दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारा उग्र वासमिश्रित द्रव पदार्थ असा माल विनापरवाना गैरकायद्याने जवळ बाळगल्यामुळे पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.पेणच्या आसानी डोंगरभागात दारूभट्टीवर कारवाईच्वडखळ : पेण पोलिसांनी गावठी दारूविरोधातील मोहीम तीव्र केली असून गावठी दारूविक्रे त्यांचे व हातभट्टीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. दोन दिवसांपूर्वी खरोशी गावातील गावठी दारूभट्टीवर कारवाई करून आठ हजारांचा गावठी दारूसाठा नष्ट करण्यात आला होता, च्त्यानंतर पुन्हा गुरुवारी सकाळी आसानी, बंगलावाडी जंगल भागात जाऊन पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, पो.कॉ. मारु ती पांढरे, अजित काळभोर, होमगार्ड दरवडा, श्रीवीर व व्यसनमुक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी जाऊन पाच हातभट्टी फोडल्या, च्या वेळी २०० लीटरच्या प्लॅस्टिकच्या टाक्या अशा एकूण तीन हजार लीटर दारूचे रसायन नष्ट केले. पोलिसांनी आठवडाभरात सलग कारवाई केल्याने दारूभट्टीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.