शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर स्फोटात लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:09 IST

मुरुड चिखलपाखाडी येथील रहिवासी अजित जोशी यांच्या घरात शुक्रवारी रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आजूबाजूच्या घरांचेही लाखो रुपयांचे नुकसान होऊन नऊ जण गंभीर जखमी झाले.

- गणेश चोडणेकर आगरदांडा : मुरुड चिखलपाखाडी येथील रहिवासी अजित जोशी यांच्या घरात शुक्रवारी रात्री गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आजूबाजूच्या घरांचेही लाखो रुपयांचे नुकसान होऊन नऊ जण गंभीर जखमी झाले. स्फोटाची माहिती मिळताच, मुरुडचे पोलीस निरीक्षक किशोर साळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नऊ जखमींना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.नगरपालिकेच्या अग्निशमन पथक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने स्फोट झालेल्या घरावर पाणी मारून आग आटोक्यात आणण्यात आली; परंतु स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या घरांचे पत्रे उडाले, कौलांचे नुकसान झाले आणि भिंतींनाही तडे जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले.चिखलपाखाडीतील आदिती जोशी रात्री जेवण बनवत असताना सिलिंडर संपला म्हणून त्यांनी दुसरा सिलिंडर लावण्यास घेतला, सील तोडले असता गॅस गळती होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गळती कशी थांबवावी, हे लक्षात न आल्याने सिलिंडरचा स्फोट झाला आणि तो देवघरात फेकला गेला. यातून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर येऊ लागल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये शॉकसर्कि ट होऊन आग लागली आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, शेजारी उदय साठे, जयंत शेडगे व शशिकांत गुरव यांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले. स्फोटात प्रथमेश जोशी ( २९), मुबीन खान (३५), मुस्तफा खान (४), आदिती जोशी (५०), शबाना खान (३०), मंगेश जोशी (२६), समिधा उपाध्ये-शेजारी (२४) , मुस्तकीम खान (८), मनीषा मेश्राम (२७), ऋ ता मेश्राम (४) आदी जखमी झाले आहेत. यात आदिती जोशी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे.>अधिका-यांनी घेतली रुग्णांची भेटस्फोटातील जखमींना योग्य ती भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन या वेळी भानू मोहन यांनी दिले. तर मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा करून योग्य ती भरपाई देण्यात येईल, असे सांगितले.शनिवारी सकाळी एचपी गॅस मुंबई येथून सेल्फ आॅफिसर- भानू मोहन यांनी घटनास्थळी पाहणी केली, तसेच स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांचीही रुग्णालयात भेट घेतली.या वेळी मुरुड नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे, महेश भगत व त्यांचे सहकारी, नगरसेवक मंगेश दांडेकर, आशिष दिवेकर, नयन कर्णिक, प्रवीण बैकर, नाना गुरव, श्रीकांत सुर्वे आदी उपस्थित होते.