शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

भातकापणीसाठी मजूर महागले

By admin | Updated: October 24, 2016 01:47 IST

अवकाळी पावसाचा काही भरवसा नसल्याने तालुक्यातील सर्वच गाव-पाडयांत शेतकऱ्यांनी हळव्या भातकापणीच्या कामांनी वेग पकडला आहे.

विक्रमगड : अवकाळी पावसाचा काही भरवसा नसल्याने तालुक्यातील सर्वच गाव-पाडयांत शेतकऱ्यांनी हळव्या भातकापणीच्या कामांनी वेग पकडला आहे. सर्वच आदिवासी शेतकरीवर्गाने आपल्या रितीप्रमाणे शेतवरील देवतांना नारळ फोडून कापणीच्या कामाला लागलेला आहे. मात्र हा हंगाम भातकापणीचा असल्याने सर्वत्र शेतावर हीच कामे चालू आहेत. त्यामुळे या हंगामात कुणीही व्यक्ती मोकळा दिसत नाही.अगर त्यांस कामाची आवश्यकता नसते. कारण आपल्याच शेतावरील काम भरपूर असल्याने दुसरीकडे जाण्यास वेळस नसतो. भातकापणीची कामे एकच वेळेस सर्वत्र चालू झाल्याने आता मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही भागात कापणीची कामे खोळंबली आहेत.विक्रमगड तालुक्यातील ८६ गावे व अनेक पाडे असून ८५८५ हेक्टर क्षे़त्रावर भाताची लागवड केली जाते. येथील शेतकरी झिनी, सुरती, गुजरात-११, गुजरात-४, रत्ना, जया, सुवर्णा, कर्जत, मसुरी आदीविध भातांच्या वाणांची लागवड करुन उत्पन्न घेतात. येथील गावठी भाताच्या वाण प्रसिध्द असून त्याची मागणीही मोठी आहे.या भागात भाताचेच मोठे व एकच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने या भागाला भातशेतीचे कोठार म्हणून ओळखले जात आहे. तालुक्यात कारखानदारी एम.आय.डी.सी वा कोणतेही मोठे धंदे नसल्याने येथील शेतीव्यवसायांवरच अवलंबून असलेल्या मजुरांना चार महिने हाताला काम मिळते. परंतु सर्वत्र शेती केली जात असल्याने प्रत्येक कुटुंबे आपल्या शेतावर काम करण्यातच चार महिने निघून जात असल्याने भातलावणीसाठी व अन्य शेतीच्या कामांसाठी इतर शेतकऱ्यांना तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, नाशिक या ठिकाणाहुन मजूर आणावे लागत आहेत. या मजुरांना दररोज २०० ते ३०० रु मजुरीप्रमाणे मोजावे लागणार असून शिवाय दोन वेळच्या जेवणाचा खर्च द्यावा लागतो. मात्र मजुरी वाढलेली असली तरीही मजुरांअभावी भात संपुष्टांत येण्याच्या मार्गावर आहे. (वार्ताहर) हा ग्रामीण आदिवासी भागत असल्याने येथे मजुरांची संख्या मोठी आहे. जे शेत मजुरीची कामे करु शकतात असे मजूर बोटींवर मासेमारीकरिता जात असतात. तसेच बिल्डींगची कामे, नदी व खाडीकिनारी वर्षभर रेती काढण्याकरिता जात आहेत. यामुळे भातशेतीसाठी हंगामात मिळणारे मजूर मिळत नसल्याने भातपिकाची कामे कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यातच श्रीमंत शेतकरी शेतामध्ये स्वत: राबत नसल्याने मजूर लावूनच शेती करीत असल्याने त्यांना तर मोठा फटका बसलेला आहे.