लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : ग्रामपंचायत वढाव आणि को. ए. सो. बळीराम गणा ठाकूर विद्यालय, वढाव यांच्या विनंतीवरून जेएसडब्लू स्टील लिमिटेड डोलवी प्रकल्पाच्या व्यवस्थापनातर्फे माध्यमिक शाळेसाठी प्रयोगशाळा बांधून देण्यात आली. नुकतीच ही प्रयोगशाळा वढाव हायस्कूलला सुपूर्द करण्यात आली. प्रयोगशाळेचे उद्घाटन जेएसडब्लू व्यवस्थापनाचे जनरल मॅनेजर विनय नेने यांच्या हस्ते करण्यात आले. को. ए. सो. बळीराम गणा ठाकूर संस्थेचे चेअरमन बाळाराम म्हात्रे, माजी चेअरमन वसंत ठाकूर, शाळा समिती सदस्य, माजी विद्यार्थी तसेच जेएसडब्लू व्यवस्थानाचे अधिकारी अमित पाटील, कुमार थत्ते, कैलास जुईकर व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रम पार पडला.जेएसडब्लू स्टील लिमिटेडतर्फे राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांतर्गत वढाव माध्यमिक शाळेसाठी शाळेच्या आवारातच प्रयोगशाळेचे बांधकाम करून देण्यात आले. यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून सुमारे नऊ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना एक चांगली प्रयोगशाळा मिळून त्यांचा शैक्षणिक विकास होण्यास मदत होणार आहे. सदर प्रयोगशाळा बांधून दिल्याबद्दल शिक्षकवर्ग व शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून जेएसडब्लू व्यवस्थापनाचे आभार मानण्यात आले.जेएसडब्लू व्यवस्थापनाची शिक्षणाप्रती नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली असून प्रकल्पाच्या परिसरातील जनतेला मूलभूत व शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात व त्यांच्या शैक्षणिक विकास व्हावा यासाठी जेएसडब्लू व्यवस्थापन सदैव प्रयत्नशील असते. या व्यवस्थापनाकडून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
वढाव हायस्कूलला प्रयोगशाळा सुपूर्द
By admin | Updated: May 9, 2017 01:24 IST