लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : तालुक्यातील माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुंदा आवाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळत्या सरपंच कल्पना पारधी यांनी राजीनामा दिल्याने नवीन सरपंच निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली.माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंचपदासाठी पीठासन अधिकारी पी. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन के ले होते. अनुसूचित जमाती महिला राखीव सरपंचपदासाठी निर्धारित वेळेत राष्ट्रवादीच्या कुंदा आवाटे यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता. यापूर्वीच्या सरपंच कल्पना जैतू पारधी यांनी ६ मार्च रोजी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त असलेल्या सरपंचपदासाठी एकमेव नामांकन अर्ज आल्याने पीठासन अधिकारी पाटील यांनी माणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कुंदा आवाटे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. विशेष सभेला सदस्य संगीता पेमारे, प्रेरणा कराळे, लता शेंडे, सारंग कराळे, शिवाजी कराळे, आरती खारके आदी १० सदस्य उपस्थित होते. निवडणुकीचे काम पीठासन अधिकारी पाटील यांनी पाहिले.
कुंदा आवाटे माणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच
By admin | Updated: May 13, 2017 01:10 IST