शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोथुर्डे धरणाला पडले भगदाड

By admin | Updated: July 6, 2015 02:06 IST

महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणाच्या भिंतीला भगदाड पडून धरणाला धोका निर्माण झाला आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणाच्या भिंतीला भगदाड पडून धरणाला धोका निर्माण झाला आहे. तर खैरे धरणाच्या दुरुस्तीबाबत मंत्र्यांच्या स्तरावर बैठक झाल्याने या धरणाच्या सद्यस्थितीची पाहणी रविवारी माजी आ. तथा भाजपा मुंबई प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केली. यावेळी धरणांची उपयुक्तता व त्यांना असणाऱ्या धोक्याची गंभीर दखल घेत याची कामे युध्दपातळीवर करुन घेऊन स्थानिक अधिकाऱ्यांनी आपल्याकडे पाठपुरावा करावा अशा सूचना यावेळी दरेकर यांनी दिल्या.रविवारी सकाळी माजी आ. दरेकर यांनी धोकादायक स्थितीत असणाऱ्या कोथुर्डे धरणाची पाहणी केली. यावेळी या ठिकाणी उपस्थित असणारे पाटबंधारे कोलाड विभागाचे शाखा अभियंता प्रकाश पोळ यांनी धरणाला गेल्या वर्षी पावसात पडलेल्या भगदाड व त्यामुळे धरणाला निर्माण झालेल्या धोक्याची माहिती दिली. या कोथुर्डे धरणावर महाड नगर पालिका व रायगड विभागातील २२ गावांच्या पाण्याच्या योजनांना पाणीपुरवठा होत आहे.या धरणाच्या दुरुस्तीसाठी ३.४२ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार असून केवळ डिझाइनला मान्यता न मिळाल्यामुळे फेब्रुवारी २०१५ मध्ये धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही. (वार्ताहर)