शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; मलमपट्टीसाठी सा. बांधकाम विभागाचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 01:09 IST

वाहनचालक नाराज, या वर्षीदेखील या मार्गावर दरड कोसळून काही दिवस हा मार्ग बंद होता. संचारबंदीनंतर हा मार्ग सुरू झाला असला तरी अनेक ठिकाणी हा घाट वाहनचालकांसाठी धोकादायकच बनला आहे.

दासगाव : महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पोलादपूर - महाबळेश्वर मार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी हा मार्ग खराब झाला असला तरी सालाबादप्रमाणे पोलादपूर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडून मलमपट्टी करण्याचे काम जोमाने सुरू आहे. यामुळे वाहनचालक या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.

महाबळेश्वर या थंड हवेच्या पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी पोलादपूरपासून सुमारे ४० किमीचा मार्ग आहे. हा संपूर्ण घाट मार्ग असून वाडा या गावापर्यंतचा मार्ग महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. पोलादपूर ते वाडा यादरम्यानच्या घाटाला ‘आंबेनळी घाट’ म्हणूनदेखील बोलले जाते. या मार्गावर ऐन पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना सातत्याने होत असतात. यामुळे मार्गाची दुरुस्ती, संरक्षक कठडे बांधणे, रेलिंगची कामे आदी कामे प्रति वर्षी केली जात आहेत. याकरिता लाखो रुपये खर्च केले जात असले तरी ही कामे कधीच न संपणारी आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग पोलादपूरकरिता हा मार्ग म्हणजे कुरणच बनला आहे.

या वर्षीदेखील या मार्गावर दरड कोसळून काही दिवस हा मार्ग बंद होता. संचारबंदीनंतर हा मार्ग सुरू झाला असला तरी अनेक ठिकाणी हा घाट वाहनचालकांसाठी धोकादायकच बनला आहे. सध्या या मार्गावर डांबराची मलमपट्टी करण्याचे काम सुरू असून हे कामदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्यानेच सुरू असल्याने वाहनचालक या कामाबाबत नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी हा मार्ग खराब झाला असला तरी सालाबादप्रमाणे पोलादपूर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडून मलमपट्टी करण्याचे काम जोमाने सुरू आहे. यामुळे वाहनचालक या कामाबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत. काही ठिकाणी मार्गाची चाळण झालेली असताना डांबर मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. प्रतापगडपासून महाडकडील मार्गावर डांबर टाकून पॅच मारले जात आहेत. तीव्र उताराचा घाट असल्याने वाहनांच्या टायरचे घर्षण मोठ्या प्रमाणावर होऊन नुकत्याच मारलेल्या पॅचवरील डांबरदेखील निघून जाऊन खडी दिसू लागली आहे. तीव्र उतारावरून येणाऱ्या वाहनांना आणि दुचाकीस्वारांना या खडीचा त्रास होऊ लागला आहे. वाहने घसरून अपघात होण्याची भीतीदेखील वाहनचालकांना वाटत आहे.दरीचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका महाबळेश्वर घाटातील प्रतापगड वाडापर्यंत महाड सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द आहे तर पुढील भाग हा सातारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो. हा संपूर्ण घाट मार्ग असल्याने या ठिकाणी कामाचा दर्जा उत्तम असणे गरजेचे आहे. दोन्ही विभागांकडून कामांकडे दुर्लक्ष होत आहे. काही वर्षांपूर्वी रस्त्याच्या दरीच्या बाजूने उभ्या केलेल्या रेलिंगला अद्याप रेडिअम पट्टी लावण्यात आलेली नाही. यामुळे रात्रीप्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दरीचा अंदाज येत नाही.