शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

खांदाड, खांदाड आदिवासीवाडीत मिळणार घरपोहोच रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:53 IST

नीलेश थोरे यांचा गरिबांना दिलासा; खरेदी-विक्री संघाचा रेशनकार्डधारक उपभोक्ता मेळावा

माणगाव : आजपर्यंत सर्वसामान्य जनतेला रेशनचे धान्य मिळवण्याकरिता अनेक वेळा रेशनदुकानाचे उंबरे झिजवावे लागत होते. कधी कधी रेशन मिळत नाही, कधी मिळाले तर कमी मिळते, कधी कधी महिनाभर फेऱ्या मारूनही रेशन न मिळाल्याने हताश होऊन परतावे लागते; परंतु माणगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या रेशनकार्डधारक उपभोक्ता मेळाव्यात सभापती नीलेश थोरे यांनी १ जानेवारी २०२०पासून माणगाव शहरातील खांदाड, खांदाड आदिवासीवाडी आणि सिद्धीनगरमधील रेशनकार्डधारकांना घरपोहोच रेशनधान्य प्रायोगिक तत्त्वावर दिले जाणार असल्याचे जाहीर के ले. हा अनोखा निर्णय जाहीर करून थोरे यांनी उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला.माणगाव शहरातील खांदाड येथील मराठी शाळेत रेशनकार्ड उपभोक्ता मेळावा पार पडला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना खरेदी-विक्री संघाचे सभापती नीलेश थोरे यांनी आजवर रेशनपुरवठ्यात तांत्रिक बाबींच्या अडचणीमुळे गोरगरीब व आदिवासी, तसेच सर्वसामान्य जनता यांना अनेक वेळा रेशनधान्यापासून वंचित राहावे लागते; परंतु माणगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या अधिपत्याखाली असणाºया रास्त भाव धान्य दुकानामधून जानेवारी २०२०पासून प्रत्येक उपभोक्त्यांना त्यांच्या हक्काचे रेशनधान्य थेट घरपोहोच करण्याची योजना संघ जाहीर करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही परवानाधारक व्यक्ती अथवा संस्थेने यापूर्वी असा ऐतिहासिक निर्णय घेतलेला नसून हा निर्णय केवळ माणगाव तालुका किंवा रायगड जिल्हा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राकरिता आदर्श निर्माण करणारा आहे. ही योजना जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१पर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार असून, त्यानंतरही संचालक मंडळामध्ये चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.हा निर्णय जाहीर करताच उपस्थित सर्वांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात या निर्णयाचे स्वागत केले. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात असा निर्णय झालेला नसल्याने माणगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे हे ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे. या वेळी संघाचे उपसभापती संजय मालोरे, ज्येष्ठ संचालक बाळकृष्ण अंबुर्ले, राजेश कासारे, बाबू बटवले, साक्षी येलकर, श्रद्धा मांजरे, नितीन वाघमारे, नथुराम मोरे, व्यवस्थापक समीर पोवार व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.सभापती नीलेश थोरे यांनी अधिक माहिती देताना १ ते ७ जानेवारीपर्यंत या काळात सर्व रेशनकार्डधारकांचे आवश्यक ते कागदपत्र आणि माहिती अपडेट केली जाईल. यामध्ये आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, फोटो, मोबाइल नंबर, निवडणूक ओळखपत्र इत्यादी कागदपत्र लिंक केली जातील. बºयाच जणांचे आधार कार्ड लिंक केलेले नाहीत, त्यामुळे त्यांना रेशनकार्ड मिळत नव्हते. त्यांनाही याचा लाभ मिळू शकणार आहे. जे रेशनकार्डधारक सध्या खांदाड, खांदाड आदिवासीवाडी व सिद्धीनगर येथे वास्तव्यास नाहीत. मात्र, माणगाव शहराच्या विविध भागात विखुरलेले आहेत, त्यांनाही लाभ मिळू शकणार आहे. त्यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.