शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी विकासाबरोबर राहावे

By admin | Updated: January 7, 2016 00:50 IST

कोकणातील प्रश्न तसेच येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या भागाचा विकास

अलिबाग : कोकणातील प्रश्न तसेच येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी पत्रकारांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या भागाचा विकास होण्यासाठी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी नेहमी विकासाबरोबर राहिले पाहिजे, अशी अपेक्षा आमदार पंडित पाटील यांनी बुधवारी येथे बोलताना व्यक्त केली आहे. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना.पाटील सभागृहात आयोजित पत्रकार दिन कार्यक्र मात आ. पाटील अध्यक्षपदावरुन बोलत होते.आ. पाटील पुढे म्हणाले, राज्याच्या उर्वरित भागापेक्षा कोकणातील शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत. हे प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधून कोकणाला न्याय मिळविणे आवश्यक आहे. पत्रकारांनी आपल्या भागाच्या विकासासाठी शासकीय निधी मिळाला पाहिजे यासाठी वस्तुनिष्ठ बातम्या देऊन आवाज उठविला पाहिजे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी असणारी उत्पन्न मर्यादा वाढविणे आवश्यक आहे. समाजाचे प्रश्न मांडत असताना पत्रकारांच्या स्वत:च्या अडचणी, प्रश्न दुर्लक्षित होतात. ते सोडविण्यासाठी पत्रकारांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले.ज्येष्ठ पत्रकार अभिजित राणे यांनी पत्रकार सामाजिक प्रश्नाला वाचा फोडत असताना त्यांचे मासिक वेतन तसेच इतर मूलभूत प्रश्न दुर्लक्षित केले जातात. हे प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकार संघांमार्फत एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. पत्रकारांचे प्रश्न सुटल्यास ते समाजाचे प्रश्न अधिक सक्षमपणे सोडवू शकतात असे प्रतिपादन केले.या कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अभिजित राणे, ज्येष्ठ पत्रकार शशिकांत सावंत, पंचायत समितीचे उपसभापती अनिल गोमा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरणच्रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी राजा राजवाडे स्मृती पुरस्कार डॉ.पूर्वा प्रमोद अष्टपुत्रे (अंबरनाथ-ठाणे), कै.र.वा.दिघे पुरस्कार-सिध्दार्थ नवीन सोष्टे (नागोठणे), रायगड पत्रभूषण पुरस्कार दामोदर शहासने (कर्जत), स्व.म.ना.पाटील स्मृती पुरस्कार गुरु नाथ साठीलकर (खोपोली), रामनारायण युवा पत्रकार पुरस्कार-जितेंद्र जोशी (रोहा), संतोष चौकर (श्रीवर्धन), उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार जुगल दवे (रोहा) यांना प्रदान करण्यात आले.