शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या शिक्षणपद्धतीनुरूप शिक्षकांनी जागृत राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:54 IST

शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकली पाहिजेत, हा ध्यास घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली

अलिबाग : शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकली पाहिजेत, हा ध्यास घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. तोच वारसा घेऊन आज शिक्षक परिषद राज्यात काम करीत आहे. मात्र, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा हळूहळू लोप पावत आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीमुळे, बहुजनांना शिक्षणापासून दूर करण्याची व्यवस्था वेगात सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांनी जागृत राहून, हे प्रकार थांबविण्याची गरज आहे, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले.महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने येथील पीएनपी नाट्यगृहात आयोजित राज्यव्यापी शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आ. पंडित पाटील, महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, उपाध्यक्ष मुरलीधर गोडबोले, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, बीडचे उपनगराध्यक्ष रजपुत इनामदार, प्राध्यापक संघटना जिल्हा अध्यक्ष प्रा. विनोद इंगेवाडा, प्राथमिक शिक्षक संघटना अध्यक्ष व्यंकटराव जाधव, माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष विकास चाभरीकर आदी मान्यवर उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेने राज्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. जे समाजात चांगले काम करतात, त्यांना पुरस्कार देण्याची चांगली परंपरा परिषदेने सुरू केली आहे. खºया अर्थाने स्फूर्ती, प्रेरणा देण्याचे काम संस्थेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली संस्थेमार्फत केले जात आहे. जी चळवळ महात्मा ज्योतीराव फुलेंनी त्या वेळी सुरू केली. ती पुढे नेण्याची, वाढविण्याची आवश्यकता आहे. शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल अपेक्षित असून शेतकरी, कष्टकरी, बहुजनांची मुले शिकून समाजात टिकतील, त्यादृष्टीने, सामाजिक बांधिलकी म्हणून काम करा, असा सल्ला त्यांनी दिला.