शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा - कविता द्विवेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 23:49 IST

निर्भयपणे, प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी केले आहे.

नारायण बडगुजर

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २९) मतदान होणार असून निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदान हे हक्क आणि राष्ट्रीय कार्य आहे. त्यामुळे निर्भयपणे, प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी केले आहे. त्यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने साधलेला संवाद.

प्रशासकीय तयारीविषयी सांगा?मतदानाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून सहा विधानसभा मतदारसंघांतील क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यांत प्रशिक्षण दिले. मनुष्यबळ सज्ज आहे. मतदान यंत्रांचे वाटपही झाले. नियंत्रण कक्ष, मीडिया सेल, आचारसंहिता भंग होऊ नये, म्हणून व्हिजिलन्स सतर्क आहे.

इमर्जन्सीमध्ये परिस्थितीवर नियंत्रणासाठी उपाययोजना कोणत्या?नियमित, अतिरिक्त भरारी पथक सज्ज आहे. पोलिस पथकांचाही समावेश आहे. पनवेल आणि चिंचवड येथे प्रत्येकी अतिरिक्त चार, तर पिंपरीत भरारी पथके आहे. संवेदनशील केंद्रांवर कडेकोड बंदोबस्त आहे. केंद्रावरील गर्दी आणि त्यातून गोंधळ झाल्यास त्यावेळी कोणती दक्षता घ्यावी, याचे प्रशिक्षण केंद्रांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहे. गोंधळ घालणाºयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. याबाबत अधिकाºयांना सूचना दिल्या आहेत. मतदान यंत्रात बिघाड होणे. बिघाड झालेली यंत्रे बदलण्याचे अधिकार सेक्टर अधिकाºयांना आहेत. शहरी भागात १० ते १५ मिनिटांत तर ग्रामीण भागात २० ते २५ मिनिटांत मशिन बदलण्यात येईल.

स्थलांतरित मतदान केंद्रांबाबत उपाययोजना कोणत्या?शाळेची इमारत धोकादायक असेल, पडझड झाली असेल. अन्य कारणांमुळे ठिकाणाहून मतदान केंद्र स्थलांतरित करावे लागते. अशा केंद्राचे स्थलांतर केल्याची माहिती मतदारांपर्यंत माध्यमांमार्फत पोहचविली असून जुन्या केंद्रावर सूचना फलक लावले आहेत.

‘वोटर स्लीप’ मिळाल्या नसल्यास मतदारांनी काय करावे?‘वोटर स्लीप’ वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. शहरी भागातील काही मतदार त्यांच्या पत्त्यावर आढळून आले नाहीत किंवा संबंधित बीएलओ (बूथ लेवल ऑफिसर) आणि मतदार यांची भेट झाली नसल्यास अशा मतदारांना स्लिप मिळाल्या नाहीत. अशा मतदारांसाठी चार पर्याय आहेत. १९५० या क्रमांकावरून, निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ आदी पर्यायांचा वापर करता येईल. यासह सुविधा केंद्रातूनही वोटर स्लीप मिळू शकते. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी व्हील चेअर आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmaval-pcमावळthane-pcठाणेElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग