शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये रेल्वे पुलाच्या चढणीवरून ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 00:44 IST

चौक-मुरबाड रस्त्यावरील घटना : सुदैवाने रहिवाशांचे वाचले प्राण; चालकही सुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : चौक-मुरबाड रस्त्यावर चारफाट्यानंतर असलेल्या रेल्वे पुलाच्या कर्जत बाजूच्या चढणीवर एक लोखंडी सळया भरलेला ट्रक पलटी झाला आणि अडकला, अन्यथा खाली राहणाऱ्या घरातील रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता. ट्रक पलटी झाल्यावर ट्रकची पुढची काच फुटल्याने चालक सुरक्षितपणे बाहेर आला. ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडली. 

लोखंडी सळया भरलेला ट्रक मुरबाडहून खोपोलीकडे जात असताना रेल्वे पुलाच्या अलीकडे असलेल्या चढणीवर ट्रॅक आला असता एका स्काॅर्पिओ गाडीने त्या ट्रकला हूल दिली आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक चढणीवरील लोखंडी पाईपचा कठडा तोडून खाली पलटी झाला. हा ट्रक पूर्णपणे खाली न जाता मध्येच अडकला. यावेळी मोठा आवाज झाला व त्यातील लोखंडी सळया ट्रकमधून खाली असलेल्या मुद्रे बुद्रुकमधील घरांजवळ पडल्या. ट्रक अडकल्याने घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या जीविताचा धोका टळला. अन्यथा झोपेमध्ये किती जणांचे प्राण गेले असते हे सांगता येत नाही. हा ट्रक पलटी झाल्यावर त्याची समोरची काच फुटली त्यामुळे चालक रामदास कांबळे त्यातून सुरक्षित बाहेर पडला. 

 

टॅग्स :RaigadरायगडKarjatकर्जत