शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

कर्जतचा पर्यटन व्यवसाय धोक्यात

By admin | Updated: July 25, 2016 03:02 IST

गेल्या सहा-सात वर्षांत कर्जत तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांना प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत तेथील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले आहे

कांता हाबळे,  नेरळगेल्या सहा-सात वर्षांत कर्जत तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांना प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत तेथील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले आहे. मुंबई-पुण्याहून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या नेरळ, भिवपुरी रोड, कर्जत व खोपोली या रेल्वे स्थानकांवर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईकरांची असलेली तुफान गर्दी हे चित्र स्पष्ट करते. मात्र कर्जत तालुक्यातील पर्यटनस्थळांवर शासनाने जमावबंदी लागू केल्याने या अलोट गर्दीला ओहोटी लागली आहे.पावसाला सुरुवात झाली की कर्जत परिसराला जणू हिरवेगार शालू परिधान केलेलं रूप प्राप्त होतं. आल्हाददायक व थंडगार वातावरण निर्माण होऊन डोंगरातून झरे वाहायला सुरुवात होते. आता मोबाइल कॅमेऱ्यातही उत्तम दर्जाचे छायाचित्रण करणे शक्य असल्याने एखाद्या ठिकाणची छायाचित्रं काही क्षणांत सोशल नेटवर्किं गवर सेल्फीच्या स्वरूपात अपलोड होतात व तितक्याच लाइक्स अन् पोस्ट शेअर केल्या जातात व पर्यटकांचे एकदा तरी जाऊ या, म्हणत प्लॅन्स ठरले जातात. याआधी माथेरान या थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध असलेला कर्जत तालुका पावसाळी पर्यटनासाठी ओळखला जाऊ लागला. तो येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्या डोंगरकपारीतील फेसाळत वाहणाऱ्या धबधब्यांमुळे वीकेंडला येणाऱ्यांची भलतीच गर्दी होते. यामुळे येथील आषाणे-कोषाणे, कोंदीवडे, खांडसमार्गे भीमाशंकर घाटमाथा ट्रेकिंग, नेरळ येथील टपालवाडी, बेकरे येथील धबधब्यांची पावसाळी पर्यटनस्थळांच्या यादीत नोंद झाली. सोलनपाडा हे नेरळपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरील धरण असून, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या धरणावर पर्यटकांची अलोट गर्दी होऊ लागली. या जमाव बंदीचा सर्वात जास्त परिणाम येथील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने ऐन हंगामात हा व्यवसाय थंडावल्याचे चित्र आहे.नेरळ, कशेळे, कर्जत येथील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहावयास मिळतो. सोलनपाडा तसेच इतर धरणांवर गर्दी कमी झाल्याने मद्य विक्र ीवर देखील परिणाम झाला आहे. येथील खासगी वाहतूक करणाऱ्या चालकांना याचा खूप फायदा होत होता. पावसाळ्याच्या तीन -चार महिन्यांत चांगले उत्पन्न मिळत असल्याचे सांगतात, मात्र या बंदीचा परिणाम व्यवसायावर झाल्याचे या चालकांनी सांगितले. नेरळ व कशेळे येथून पर्यटनस्थळी पोचवणारे खासगी वाहनचालक नाखूश आहेत. खासगी भाडे मारून दिवसागणिक २,५०० ते ३,००० एवढी कमाई होत होती. मात्र पर्यटकांनी पाठ फिरवल्याने १,००० रु पये कमवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.