शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत ठाकूरवाडीला समस्यांचे ग्रहण, सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 06:36 IST

कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरवाडी आणि सावरगाव ठाकूरवाडी या दोन आदिवासी वाड्यांमधील आदिवासींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरवाडी आणि सावरगाव ठाकूरवाडी या दोन आदिवासी वाड्यांमधील आदिवासींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन कारावा लागत आहे. असे असताना याकडे प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आदिवासी ग्रामस्थांकडून केला जात आहे.यामध्ये प्रामुख्याने देऊळवाडी ते ठाकूरवाडी वस्तीमध्ये जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे या कच्च्या रस्त्यावरून ग्रामस्थांना गेली कित्येक वर्षे ये -जा करावी लागत आहे. डोंगर उतारावर ही वाडी असल्याने संपूर्ण रस्ता वळणाचा आणि चढ-उताराचा आहे. येथे पक्का रस्ता नसल्याने शासकीय बससेवा तसेच खासगी रिक्षा सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे या आदिवासींना जड सामान घेऊन दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते.तसेच वाडीत कोणी जास्तच आजारी पडल्यास त्या रु ग्णाला चादरीची झोळी करून रु ग्णालयात न्यावे लागते, तर कधी कधी महिलांची प्रसूती नाइलाजाने जीव धोक्यात घालून घरीच करावी लागते. यामुळे महिलेला हवे तसे उपचार मिळत नाहीत.या ठाकूरवाडीत सुमारे २० ते २५ आदिवासी घरांची वस्ती आहे. त्यांच्यासाठी येथे सार्वजनिक पाण्याची विहीर आहे. पावसाळा आणि त्यानंतर चार महिने जेमतेम पाणी पुरते. मात्र उन्हाळ्यात ही विहीर कोरडी पडत असल्याने दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र हे पाणीही कमीपडत असल्याने येथील महिलांना डोक्यावर हंडे घेऊन वणवण भटकावे लागते.याबाबत ग्रामस्थांबरोबर संवाद साधला असता त्यांनी या वाडीची नोंद शासकीय दरबारी नसल्याचे सांगितले. या संदर्भात त्यांनी अनेक वेळा सरकार दरबारी खेटे घातले, परंतु त्यांना संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, अशी माहिती गणेश पारधी, पांडू दरवडे, मंगल साबरी, गणेश सांबरी, लक्ष्मण पिरकट, वामन सांबरी, प्रदीप सांबरी, चंद्रकांत हिंदोळा, काळुराम लोटे, दामू सांबरी, रामा दरवडे यांनी दिली.विजेच्या समस्येने ग्रामस्थ त्रस्तया वाडीवर वीज पोहोचली आहे; परंतु अनेक वेळा कमी दाबाने वीज असल्याची ग्रामस्थांची तक्र ारी आहेत. या वाडीत शासकीय साधन सुविधा सवलतीची कमतरता असून अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. ते अजूनही यापासून वंचित आहे.या ठाकूरवाडीत सुमारे २० ते २५ आदिवासी घरांची वस्ती आहे. येथे अनेक सुविधांची वानवा आहे.

टॅग्स :Raigadरायगड