शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत एसटी आगाराचे उत्पन्न रायगड जिल्ह्यात सर्वाधिक

By admin | Updated: August 21, 2015 02:22 IST

चार - पाच वर्षांपूर्वी कर्जतचे एसटी आगार बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन आगार व्यवस्थापकांनी विविध क्लृप्त्या लढवून आगार वाचवून

विजय मांडे, कर्जतचार - पाच वर्षांपूर्वी कर्जतचे एसटी आगार बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन आगार व्यवस्थापकांनी विविध क्लृप्त्या लढवून आगार वाचवून उत्पन्नही वाढविले होते. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपूर्वी पुन्हा आगाराचे उत्पन्न घटले व लाखो रुपयांचा तोटा होऊ लागला, परंतु एक चालक असलेल्या कामगाराकडे आगार व्यवस्थापकाचा पदभार देण्यात आला आणि आगाराचे आर्थिक उत्पन्न वाढले. मागील एप्रिल ते जून महिन्यात ३३ लाख ३४ हजार रु पयांचा तोटा असलेले आगार यंदा ती तूट भरून काढीत २६ लाख ४३ हजार रु पये फायद्यात आला. विशेष म्हणजे सुमारे ५२ हजार किलोमीटर प्रवासात वाढ झाली असून प्रवासी संख्याही लक्षणीय वाढली आहे. गतवर्षी जुलै महिन्यात ३५ लाख ८३ हजार रु पये तोटा होता. तो भरून काढून यंदा जुलैमध्ये ३ लाख १३ हजार रुपये फायदा झाल्याने रायगड जिल्ह्यात कर्जत आगार प्रथम क्रमांकावर आलेले आहे. तीस-बत्तीस वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार तुकाराम सुर्वे यांनी कर्जत आगार सुरु करण्यासाठी प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यावेळी एसटी ही एकच प्रवासाचे साधन होते. त्यामुळे एसटी फायद्यात होती. कालांतराने रिक्षा, सहा आसनी रिक्षा आल्या आणि एसटीची घरघर सुरू झाली. काही मार्गावरच्या एसटी गाड्या प्रवाशांअभावी बंद कराव्या लागल्या. त्यामुळे कर्जतचे आगार बंद होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र तत्कालीन आगार व्यवस्थापक बी. एस. मगदूम यांनी अनेक क्लृप्त्या काढून विविध मार्गांवर गाड्या सुरू करून कर्जत आगाराला चांगले दिवस आणले. ते निवृत्त झाले व त्यानंतर कर्जत आगार अडचणीत आले. त्यानंतर तेथे आलेल्या तत्कालीन आगार व्यवस्थापकांची बदली झाली आणि प्रभारी आगार व्यवस्थापक पद आगारात चालक असलेल्या डी. एस. देशमुख यांच्याकडे आले. विविध एसटी संघटनांमध्ये काम केलेल्या देशमुख यांना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची हातोटी असल्याने सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन विविध उत्पन्नाच्या बाबी शोधून आगार सुस्थितीत आणले. लाखोंचा तोटा भरून काढून फायद्यामध्ये आगार आले आणि आज रायगड जिल्ह्यातील आठ आगारांमध्ये उत्पन्नात प्रथम क्र मांकावर आणले. या कार्याबद्दल विभाग नियंत्रक अजित गायकवाड यांनी देशमुख यांचा सत्कार केला. (वार्ताहर)