शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत-पळसदरी भरदिवसा मेगाब्लॉक

By admin | Updated: March 24, 2017 01:14 IST

कर्जत ते पळसदरी दरम्यान भरदिवसा म्हणजेच सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतल्यामुळे चाकरमानी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल

कर्जत : कर्जत ते पळसदरी दरम्यान भरदिवसा म्हणजेच सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतल्यामुळे चाकरमानी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या वेळेदरम्यान खोपोलीहून सुटणारी १०.२० व ११.३० या लोकल पळसदरीपर्यंतच चालविण्यात येत आहे, तसेच कर्जतहून १०.५५ व १२.०५ हून सुटणारी लोकल कर्जत ते पळसदरीदरम्यान रद्द करण्यात आली आहे. कर्जत ते पळसदरीदरम्यान सध्या काही दिवसांपासून देखभाली कामानिमित्त रेल्वे प्रशासन मेगाब्लॉक घेत आहे. गेल्या आठवड्यापासून मेगाब्लॉक चे सत्र सुरूच आहे. आज व उद्या सुद्धा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, परंतु हा मेगाब्लॉक कामाच्या दिवशी व तो ही सकाळी १० ते दुपारी १ च्या दरम्यान घेत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून खास करून चाकरमानी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे यामुळे हाल होत आहेत. या मेगाब्लॉकमुळे बसने किंवा रिक्षाने प्रवास करावा लागत आहे.इतर ठिकाणी मेगाब्लॉक रविवारी घेण्यात येत असताना येथे मात्र रात्री घेतला जात असतो. कर्जत ते पळसदरी या मार्गावरील मेगाब्लॉक कामाच्या दिवशी तो ही सकाळी १० ते दुपारी १ च्या दरम्यान घेऊन रेल्वे प्रशासन कर्जतकरांवर अन्यायच करीत असल्याचा आरोप कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे पंकज मांगीलाल ओसवाल यांनी केला आहे. पंकज ओसवाल यांनी डीआरएमला ट्विट करून मेगाब्लॉक रद्द करण्याची विनंती सुद्धा केली आहे. (वार्ताहर)