शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये तहसीलदारांच्या आदेशाला केराची टाेपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 01:08 IST

आदेशानंतरही अतिक्रमण करून रस्ता अडवला, ग्रामस्थ झाले आक्रमक

कर्जत : तालुक्यातील वरई ग्रामपंचायतीमधील आरवंद गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश तहसिलदारांनी दिले हाेते. मात्र, फार्म हाउसच्या मालकाने पुन्हा अतिक्रमण करत, सरकारी आदेश जुमानत नसल्याचे दाखवल्याने ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह शुक्रवारी जागेची पाहणी केली.संबंधित फार्म हाउसचा सातबारा ज्या महिलेच्या नावे आहे. त्यांचे पती कर्जत तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पदावर काम करीत होते आणि तेच ग्रामस्थांचा रस्ता अडवितात? अशी माहिती माजी सरपंच रमेश धुळे यांनी दिली आहे. आरवंद स्मशानभूमीकडे जाण्यासाठी असलेला रस्ता पोसरी-साळोख रस्त्याच्या बाजूने जातो. त्या ठिकाणी जमीन खरेदी करणाऱ्या सुहासिनी रामलाल सरोते यांनी रस्ताबंद केला आहे. याबाबत स्थानिक वरई ग्रामपंचायतीने कर्जत तहसील कार्यालयाकडे तक्रार केली होती. २२ जुलै, २०१९ मध्ये स्थानिक चार गावांतील ग्रामस्थांनी मोठे आंदोलनही उभे केले हाेते. त्यानंतर, कर्जतचे तत्कालीन तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी याबाबतचा अहवाल मागीतला हाेता. त्यावेळी सराेते यांनी १० फूट रस्ता देत असल्याचे लेखी प्रशासनाला लिहून दिले हाेते. त्यानंतर, तहसीलदार यांनी वरई ग्रामपंचायतीला २२ जुलै, २०१९ राेजी लेखी आदेश देत रस्ता माेकळा करण्यास सांगितले. त्यानुसार, वरई ग्रामपंचायतीने २०१९ मध्ये रस्ता माेकळा केला हाेता. मात्र, डिसेंबर, २०२० मध्ये संबंधित जमीन मालकामे पुन्हा रस्ता अडविला. संतप्त ग्रामस्थ रमेश धुळे आणि २०० हून अधिक ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन कर्जत तहसीलदार यांना दिले. कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी नायब तहसीलदार बाचकर यांना घटनास्थळी पाठवून सद्यस्थितीचा अहवाल देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, ११ डिसेंबर रोजी नायब तहसीलदार बाचकर यांनी आरवंद येथील विवादास्पद जागेची पाहणी केली.कर्जत तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीच्या बाजूने पूर्वापार रस्ता होता. त्यांची जमीन मोजणी केली, त्यावेळी त्यांची हद्द आणि आता बांधकाम केलेली हद्द यात तफावत आहे. त्यामुळे सरकारी सेवेतील व्यक्ती आपल्या ओळखीचा वापर करून अतिक्रमण करत आहेत. सरकारने यांची चाैकशी करावी.- रमेश धुळे, अध्यक्ष, तंटा मुक्त समितीतहसीलदार विक्रम देशमुख यांच्या आदेशाने आपण वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी आलो आणि पाहणी करून संबंधित अहवाल तहसीलदार यांना सादर करणार आहोत.सोपान बाचकर, नायब तहसीलदार, कर्जत