शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत आगार महाराष्ट्रात पहिले

By admin | Updated: May 6, 2016 01:22 IST

चार-पाच वर्षांपूर्वी कर्जतचे एसटी आगार बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन आगार व्यवस्थापकांनी विविध क्लृप्त्या लढवून आगार वाचवून

- विजय मांडे,  कर्जतचार-पाच वर्षांपूर्वी कर्जतचे एसटी आगार बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन आगार व्यवस्थापकांनी विविध क्लृप्त्या लढवून आगार वाचवून उत्पन्नही वाढविले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी पुन्हा आगाराचे उत्पन्न घटले व लाखो रु पयांचा तोटा होऊ लागला. त्यानंतर एक चालक असलेल्या कामगाराकडे आगार व्यवस्थापकाचा पदभार देण्यात आला आणि त्यांच्या कल्पकतेमुळे आगाराचे आर्थिक उत्पन्न वाढले व मागील एप्रिल ते मार्च महिन्यात एक कोटी ६९ लाख ५८ हजार रु पयांचा तोटा असलेले आगार यंदा ती तूट भरून काढीत ३५ लाख २३ हजार रु पये फायद्यात आले. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत तीन लाख किलोमीटर प्रवासात वाढ झाली असून प्रवासी संख्याही लक्षणीय वाढली आहे. गतवर्षी रायगड जिल्ह्यात कर्जत आगार प्रथम क्र मांकावर होते आणि यंदा महाराष्ट्रात कर्जत आगार प्रथम क्रमांकावर आले आहे. तीस-बत्तीस वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार तुकाराम सुर्वे यांनी कर्जत आगार सुरु करण्यासाठी प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यावेळी एस.टी. ही एकच प्रवासाचे साधन होते. त्यामुळे एस.टी. फायद्यात होती. कालांतराने रिक्षा, सहा आसनी रिक्षा आल्या आणि एसटीची घरघर सुरु झाली. काही मार्गावरच्या एसटी गाड्या प्रवाशांअभावी बंद कराव्या लागल्या. त्यामुळे कर्जतचे आगार बंद होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु तत्कालीन आगार व्यवस्थापक बी. डी. मगदूम यांनी अनेक क्लृप्त्या काढून विविध मार्गावर गाड्या सुरु करून कर्जत आगाराला चांगले दिवस आणले. ते निवृत्त झाले व त्यानंतर आलेल्या आगार व्यवस्थापकांनी केवळ पाट्या टाकण्याचे काम केल्याने पुन्हा कर्जत आगार अडचणीत आले. लाखो रु पयांचा तोटा होऊ लागला. आगार व्यवस्थापकांची बदली झाली आणि प्रभारी आगार व्यवस्थापक पद आगारात चालक असलेल्या डी. एस. देशमुख यांच्याकडे आले. विविध एस. टी. संघटनांमध्ये काम केलेल्या देशमुख यांना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची हातोटी असल्याने सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन विविध उत्पन्नाच्या बाबी शोधून आगार सुस्थितीत आणले. लाखोंचा तोटा भरून काढून फायद्यामध्ये आगार आले. गतवर्षी रायगड जिल्ह्यातील आठ आगारांमध्ये उत्पन्नात प्रथम क्र मांकावर आणले. यंदाच्या आर्थिक वर्षात १२४.३६ या उच्चांकी गुणक्र मांकाने महाराष्ट्रात उत्पन्नात सर्व प्रथम येण्याचा मान पटकावला. इतकेच करून देशमुख गप्प बसले नसून कामगारांसाठी कबड्डी, हॉलीबॉल आणि क्रि केट खेळण्यासाठी आगाराच्या दुर्लक्षित जागेवर मैदाने उपलब्ध करून दिली. शिवाय संपूर्ण आगार व्यसनमुक्त करण्याची किमया सुद्धा देशमुखांनी केली असून शासकीय आदेशांचे पालन करून विविध उपक्र म राबविण्यात सुद्धा हे सर्व कर्जत आगाराचे कर्मचारी पुढे असतात.