शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोली स्टील मार्केट पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:07 IST

कळंबोली स्टील मार्केटमधील लोहपोलाद गोदाम आणि यार्ड सध्या पाण्याखाली गेले आहे. अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : कळंबोली स्टील मार्केटमधील लोहपोलाद गोदाम आणि यार्ड सध्या पाण्याखाली गेले आहे. अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना या ठिकाणी काम करणाºया माथाडींना गैरसोयीला सामोरे जावे लागले. दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असली तरी याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाही.कळंबोली लोह-पोलाद मार्केट सिडकोने विकसित करत असताना अंतर्गत रस्ते निर्माण केले नाहीत. त्यामुळे गेली कित्येक वर्षे हे रस्ते मातीचेच आहेत. देशाच्या कानाकोपºयातून लोखंड आणि पोलादाची ने-आण करण्याकरिता अवजड वाहने या ठिकाणी येतात. शेकडो कि.मी. अंतर कापताना जितका त्रास होत नाही त्यापेक्षा जास्त त्रास स्टील मार्केटमध्ये वाहने आल्यावर होतो याशिवाय वाहनांचे नुकसानही होत असल्याने मेंटेनन्सवरही खर्चहोत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.स्टील मार्केटमधील रस्त्यावर कधीच डांबर टाकण्यात आलेले नाही. दोन ते तीन फूट खोल खड्डे याठिकाणी पडले आहेत. ते बुजविण्याची तसदी ना सिडकोने घेतली ना बाजार समितीने. त्यामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. त्यातच पावसाचे पाणी जाण्याकरिता पावसाळी नाले नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. गेल्या काही दिवसांपासून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रस्ते पाण्यात व खड्ड्यांत हरवले आहेत. कित्येक वाहने बंद पडल्याने ते बाहेर काढण्याकरिता मोठी कसरत करावी लागली. लोखंड उचलण्याकरिता क्रे न सुद्धा पाण्यात चालवणे अतिशय कठीण झाले होते. स्टील यार्ड त्याचबरोबर व्यापाºयांच्या गोदामात पाणी शिरल्याने मालाची वाहतूक काही प्रमाणात मंदावली आहे. लोह-पोलाद बाजार समितीने खड्डे बुजविण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची तक्रार शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम यांनी केली आहे. याठिकाणी तात्पुरते नाले काढून पावसाच्या पाण्याला वाट करून देण्याची गरज असल्याचे मत वाहतूकदार गोविंद साबळे यांनी व्यक्त केले.लोह-पोलाद बाजार समिती व्यापाºयांकडून कर वसुली करते. त्याचबरोबर स्टील मार्केट परिसरात येणाºया वाहनांकडून प्रवेश शुल्क आकारले जाते. या बाजार समितीला उत्पन्न बºयापैकी असताना पायाभूत सुविधांवर खर्च केला जात नसल्याचा आरोप वाहतूकदार मुरलीधर गुरव यांनी केला आहे. सिडकोकडे बोट दाखवत ही समिती आपली जबाबदारी झटकत असल्याचेही व्यापारी आणि वाहतूकदारांचे म्हणणे आहे.