शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हिस रोडच्या कामाचा फटका कळंबोलीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:58 IST

पाण्याचा निचरा होण्यास अडथळा; कामोठेतील काम तीन वर्षांपासून अपूर्णच

कळंबोली : पनवेल-सायन महामार्गावर कामोठे बाजूकडील सर्व्हिस रोडचे काम तीन वर्षांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे, त्यामुळे कामोठेकरांची गैरसोय दूर होणार असली, तरी त्याचा फटका मात्र कळंबोली वसाहतीला बसू लागला आहे. या कामामुळे या वसाहतीत पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्याकरिता अडथळा निर्माण होत आहे.कळंबोली तीन मीटर खाली असल्याने कमी पावसातही पाणी साचते. त्याचबरोबर जास्त पाऊस झाल्यानंतर रहदारीला अडथळा निर्माण होतो. २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर सिडकोने पावसाळी नाल्याची निर्मिती केली. सिंग सिटी रुग्णालयाजवळ जलधारण तलाव तयार करण्यात आला. याशिवाय पाण्याचा उपसा करण्याकरिता पंपिंग सोयही सिडकोने केली आहे. यंदा सिडकोने नालेसफाई चांगल्या पद्धतीने केली होती.तसेच पाणी साचणार नाही, याकरिता बऱ्यापैकी उपाययोजना केल्या होत्या. तरीही रस्त्यावर दोन ते अडीच फूट तर काही ठिकाणी तीन फूट पाणी साचले होते, त्यामुळे कळंबोलीकरांच्या रोषाला सिडकोला सामोरे जावे लागले. मात्र, या गोष्टीला कामोठे येथील लेफ्ट टर्नचे काम कारणीभूत असल्याचा मुद्दा ज्येष्ठ शिवसैनिक आत्माराम कदम यांनी सर्व यंत्रणाच्या लक्षात आणून दिला. त्यानुसार सिडकोचे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांनी पाहणीकेली.कळंबोली जलधारण तलावात खाडीला जाणारा प्रवाह या कामामुळे अडला गेला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बॅक वॉटर कळंबोलीत जात होते.याबाबत सिडकोने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या संदर्भात सा. बां. विभागाचे उपअभियंता एस. व्ही. अलगुर यांच्याशी संपर्क साधला असता, पाहणी करून याबाबतउपाययोजना करण्यात येतील, असे सांगितले.यंदा सिडकोने चांगल्या प्रकारे नालेसफाई केली होती. मात्र, तरीही पावसाचे पाणी साचत होते. मात्र, याला कारणीभूत सार्वजनिक बांधकाम विभाग असल्याचे आम्ही निदर्शनास आणून दिले, त्यानुसार कळंबोलीकरांच्या वतीने आम्ही या विभागाच्या अधिकाºयांना जाब विचारला आहे.- आत्माराम कदम, ज्येष्ठ शिवसैनिक, कळंबोलीपावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, याकरिता सर्व त्या उपाययोजना आम्ही केल्या आहेत. मात्र, कामोठे लेफ्ट टर्नच्या कामाच्या ठिकाणी पाणी अडत असल्याने मध्यंतरी काही प्रमाणात वसाहतीत पाणी साचले होते, त्यानुसार आमच्या कार्यालयाने सा. बां. विभागाला कळविले आहे.- गिरीश रघुवंशी, कार्यकारी अभियंता,सिडको, कळंबोली नोड

टॅग्स :panvelपनवेल