शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

काका-पुतण्याचा कार अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:03 IST

मोहोपाडा नवीन पोसरी येथील तातरे कुटुंबीय कारमधून गुजरातमधील सोरटी सोमनाथ येथे देवदर्शनाला जात असताना कारला झालेल्या अपघातात काका-पुतण्या जागीच ठार झाले

मोहोपाडा : मोहोपाडा नवीन पोसरी येथील तातरे कुटुंबीय कारमधून गुजरातमधील सोरटी सोमनाथ येथे देवदर्शनाला जात असताना कारला झालेल्या अपघातात काका-पुतण्या जागीच ठार झाले, तर कारमधील चौघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.नवीन पोसरी येथील तातरे कुटुंबीय त्यांच्या स्विफ्ट कारमधून सोरटी सोमनाथ येथे शिवलिंगाच्या दर्शनाला जात असताना, गुजरातमध्ये कारचालकाचा स्टेअरिंंगवरील ताबा सुटल्याने कार समोर उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन जोरदार आदळली.या अपघातात कारमधील महादेव गंगाराम तातरे (६७) व त्यांचा पुतण्या धनाजी पांडुरंग तातरे (४२) हे दोघे जागीच ठार झाले. तर कारमधील धनाजीचे वडील पांडुरंग तातरे, मुलगी रेखा प्रदीप रसाळ, सुरेखा व वाहनचालक हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर जखमींना पनवेल येथील लाइफ लाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नवीन पोसरीतील तातरे कुटुंबातील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने, तातरे कुटुंबावर दु:खाचे सावट पसरले आहे. अपघातानंतर महादेव तातरे व धनाजी तातरे यांचे मृतदेह अंत्यसंस्काराकरिता नवीन पोसरी येथील राहत्या घरी आणण्यात आले. यानंतर त्यांच्या मृतदेहावर पाताळगंगा पुलाजवळील स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे तातरे कु टुंबावर शोककळा पसरली आहे. या वेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकारणी मंडळी, इतर नातेवाईक व मित्रमंडळी यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.