शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

इंटरनेट सेवेअभावी पोस्टाचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: July 10, 2016 00:31 IST

मुरु ड पोस्टाची इंटरनेट सेवा बंद पडल्याने गेल्या १५ दिवसांपासून मुरु ड तालुक्यातील पोस्ट कार्यालयातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना

मुरु ड/नांदगाव : मुरु ड पोस्टाची इंटरनेट सेवा बंद पडल्याने गेल्या १५ दिवसांपासून मुरु ड तालुक्यातील पोस्ट कार्यालयातील सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा फटका बसत असून, नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. बीएसएनएल अथवा रायगड जिल्हा पोस्ट कार्यालयाकडून अद्याप या समस्येवर कोणतीच उपाययोजना न झाल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे. १५ दिवसांपासून पोस्ट कार्यालयात कोणतेही व्यवहार झालेले नाहीत. त्यामुळे फिक्स डिपॉजिट पूर्ण झालेल्यांना आपले पैसे काढता आले नाहीत, तर काहींना गरज असूनही पैसे उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे. मुरुड तालुक्यातील पोस्ट कार्यालयांतर्गत आगरदांडा, काशीद, माजगाव, नांदगाव, राजपुरी, सावली, शिंगरे, उसरोळी, विहूर अशा नऊ शाखा पोस्ट कार्यालयांतर्गत हीच परिस्थिती आहे. २२ जूनपासून पोस्टाची नेट सेवा बंद पडल्याने मनीआॅर्डर, पार्सल, रजिस्टर एडी, रिकरिंग बचत खाते, अल्प बचत खाते, मासिक व्याज, पेन्शन व अन्य महत्त्वाच्या बाबी बंद आहेत. ग्रामीण भागातून लोक पैसे टाकण्यासाठी अथवा काढण्यासाठी पोस्टात येतात, मात्र त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. पोस्टाच्या अलिबाग येथील मुख्य कार्यालयाने या गलथान कारभाराची दखल घ्यावी व हा प्रश्न लवकर निकाली काढावा, अशी मागणी सर्व ग्राहकवर्ग करीत आहे. (वार्ताहर)