शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जंगल जेट्टीमुळे पर्यटकांच्या रेलचेलीमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 00:11 IST

प्रवास सुखकर : तालुका, जिल्हे एकमेकांना जोडले गेले

संजय करडे मुरूड : वाढत्या औद्योगिकीकरणामुळे अंतर्गत दळणवळणाच्या साधनांना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या जलमार्गाचे जाळे एकमेकांना जोडण्यावर शासन अधिक भर देत आहे. सध्या महागाईत प्रचंड वाढ झाल्याने सर्वच ठिकाणी पूल बांधणे शासनास अशक्य झाले आहे. एका पुलासाठी त्याच्या अंतरानुसार किमान दोनशे ते तीनशे कोटी रुपयांचा खर्च येत असतो. अशा वेळी असा खर्च करणे सर्वच ठिकाणी कठीण बाब आहे. दोन तालुके अथवा जिल्हे जोडण्यासाठी जंगल जेट्टी हा उत्तम पर्याय बनला आहे. यामधून ट्रक, एसटी, लहान चारचाकी वाहने व लोकांची मोठ्या प्रमाणात वाहतूक अगदी सुलभपणे करता येते.

या जंगल जेट्टीमुळे मुरुड तालुक्यातील आगरदांडा तर श्रीवर्धन तालुक्यातील दिघी ही गावे जोडली गेली. तसेच श्रीवर्धन तालुक्यातील बाणकोट खाडी ते रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास ही गावे जोडली गेल्याने रायगड व रत्नागिरी जिल्हे एकमेकांना जोडले गेले आहेत. त्यामुळे जंगल जेट्टी वरदान ठरत आहे.

मुरुड तालुक्यातील आगरदांडा येथून जंगल जेट्टीमुळे नागरिकांच्या चारचाकी गाड्यांसह दुचाकी वाहनांची अगदी सहज वाहतूक होऊन प्रवास करणे सोपे जात आहे. पुणे येथून येणारे पर्यटक दिवेआगर व श्रीवर्धन येथून तो मुरुड येथे सुद्धा येऊन आता वस्ती करू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढवण्यात जंगल जेट्टीचे सुद्धा सहकार्य लाभत आहे. या जंगल जेट्टीमुळे रत्नागिरी, पुणे व कोल्हापूर येथील पर्यटकांना या भागात येणे सोपे झाले आहे. पूल झाला नसला तरी जंगल जेट्टीमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.वेळ आणि पैशाची होतेय बचत

सागरी किनाऱ्यावर वसलेली गावे; परंतु खाडीचा परिसर असल्याने दळणवळणाच्या साधनात येणारा व्यत्यय पार करत जंगल जेट्टीद्वारे विकास करण्यास मदत होत आहे. रस्त्याने रत्नागिरीचे अंतर अधिक आहे, परंतु तेच जंगल जेट्टीचा वापर केल्यास हे अंतर खूप कमी पडून इंधनाची व वेळेची सुद्धा बचत होत आहे.

प्रत्येक तालुक्याचे अंतर कमी होऊन तालुके एकमेकांना जोडले जाऊन वाहतूक अंतर कमी होत आहे. तालुके एकमेकांना जोडल्यामुळे जिल्हे सुद्धा जवळ आले आहेत.जंगल जेट्टीमुळे महाराष्ट्र शासनाच्या मेरीटाइम बोर्डास प्रत्येक प्रवाशामागे लेवी कराद्वारे भरघोस उत्पन्नसुद्धा मिळत आहे. पर्यटक व स्थानिक नागरिक यांना प्रवासाचे उत्तम साधन मिळून प्रवास हा जवळचा बनला असून बहुसंख्य पर्यटक आता जंगल जेट्टीद्वारे प्रवास करताना दिसत आहेत.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्ग