शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जे.टी.एल.ला माणगाव तहसीलदारांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 02:50 IST

तालुक्यातील कोस्ते येथील जे.टी.एल. कंपनीला माणगाव महसूल खात्याकडून ५६ लाखांचा दंड आकारला आहे. हा दंड कंपनीने केलेल्या कामामध्ये रॉयल्टी बुडविल्याने आकारला आ

माणगाव : तालुक्यातील कोस्ते येथील जे.टी.एल. कंपनीला माणगाव महसूल खात्याकडून ५६ लाखांचा दंड आकारला आहे. हा दंड कंपनीने केलेल्या कामामध्ये रॉयल्टी बुडविल्याने आकारला आहे. जे.टी.एल. इन्फ्रा लि. कंपनीकडून लोखंडी पाइप बनविण्याचा औद्योगिक कारखाना उभारला जात आहे. निजामपूर ग्रामपंचायतीने २१ डिसेंबर २०१७ रोजी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द केले आहे. या कंपनीने निजामपूर ग्रामपंचायतीकडे काम सुरू होण्यापूर्वी कोणतीही कागदपत्रे सादर न केल्यामुळे निजामपूर येथील ग्रामस्थांनी २६ जानेवारी २०१८ रोजी जे.टी.एल. कंपनीला कोणत्याही खात्याला परवानगी मिळू नये यासाठी सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने ठराव मंजूर केला आहे.जे.टी.एल. कंपनीचे काम कोस्ते येथे सुरू केले अशी माहिती सुधीर पवार व सरपंच हमजा जळगावकर तसेच ग्रा.पं. सदस्य यांनी प्रसिद्धिपत्रकामध्ये दिली असून त्यांनी कोस्ते बुद्रुक गावच्या हद्दीत जे.टी.एल. कंपनीचे काम सुरू असून औद्योगिक एन.ए. नसणारी जागा एन.ए. दाखवून कंपनीचे काम सुरू आहे असे म्हटले आहे. तसेच निजामपूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत गवंड रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांना नदीच्या पाण्याकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने गुरांना पाणी पिण्यासाठी वांदे झाले आहेत. तसेच पंचायतीची पाणी योजना याच रोडलगत आहे. यामुळे नाहक त्रास येथील नागरिकांना होत आहे. या कंपनीने काम बंद नाही केले तर सुधीर पवार, सरपंच हमजा जळगावकर व ग्रा.पं. सदस्य २१ मार्च रोजी उपोषण करणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिली.तसेच निजामपूर ग्रामपंचायतीने महसूल, वन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाणीपुरवठा, महावितरण विभाग, जलसंपदा विभाग अशा अनेक ठिकाणी या कंपनीविरोधात लेखी अर्ज दिले आहेत. तसेच ही कंपनी काळ नदीलगत असल्याने या जे.टी.एल. कंपनीच्या सांडपाण्यामुळे पाणी प्रदूषित होईल. नदीचे पाणी प्रदूषित झाल्यास शेकडो गावे पाण्यावर अवलंबून असल्याने भविष्यात पाण्याचे गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता आहे.