शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

जेएसडब्ल्यूची १२० मीटर लांबीची जलवाहिनी उखडली

By admin | Updated: December 7, 2015 01:15 IST

मुंबई - गोवा महामार्गालगत डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीने १२० मीटर लांबीची दोन मीटर रु ंद आणि एक मीटर उंचीची जलवाहिनी टाकली होती

नागोठणे : मुंबई - गोवा महामार्गालगत डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीने १२० मीटर लांबीची दोन मीटर रु ंद आणि एक मीटर उंचीची जलवाहिनी टाकली होती. ही जागा वनखात्याच्या अंतर्गत येत असल्याने नागोठणे वन कार्यालयाचे वनक्षेत्रपाल बी. व्ही. पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार धडक मोहीम हाती घेत संबंधित जलवाहिनी उखडून टाकण्याच्या कामास प्रारंभ केला. ही मोहीम लवकरच पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. डोलवी (ता. पेण) येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने मुंबई - गोवा महामार्गालगत नागोठणे के. टी. बंधारा ते डोलवी अशी नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. महामार्गालगत १२० मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुद्धा चालू असल्याने त्यासाठी वनखात्याच्या ताब्यातील काही जागा केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महामार्गाच्या कामासाठी देण्यात आली आहे. इतर कोणतेही वनेतर काम करता येणार नसल्याचे वनखात्याकडून त्यावेळी महामार्ग खात्याला सूचित करण्यात आले होते. मात्र, आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता जेएसडब्ल्यू कंपनीने महामार्ग प्राधिकरणाशी अंतर्गत तडजोड करीत संबंधित जागेत जलवाहिनी टाकण्याचा प्रयत्न केला होता.कायद्याचा भंग केल्यामुळे २६ जून २०१५ ला कंपनीवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला असल्याचे वनक्षेत्रपाल बी. व्ही. पाटील यांनी सांगितले.नागोठणे परिक्षेत्र हद्दीतील गट क्र मांक दोन अ / एक ब एक या जागेतून जेएसडब्ल्यू कंपनीने जलवाहिनी टाकली आहे. या जागेत वनेतर कामास बंदी असून सेक्शन ३५ लागले आहे व त्यामुळेच वनक्षेत्रपाल आर. एच. पाटील यांनी रोहे न्यायालयात दावा दाखल केला होता, मात्र कंपनीवर कोणतीही कारवाई न करता वनखात्याकडून कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता असे मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी, अमोल पेणकर यांनी ४ आॅगस्ट २०१५ च्या पत्रान्वये उप वनसंरक्षक, रायगड, अलिबाग यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, असे असूनही वनखात्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या निषेधार्थ उपोषणाचा इशारा दिला व त्यानंतरच वनखात्याने कारवाईचे हत्यार उगारले असे पेणकर यांनी सांगितले. या धडक कारवाईत वनखात्याच्या फिरती पथकाचे सहाय्यक वनसंरक्षक चव्हाण आणि मसुरकर, नागोठणे वनक्षेत्रपाल बी. व्ही. पाटील, वनपाल केळुसकर यांच्यासह कार्यालयातील २२, पाली कार्यालयाचे १० कर्मचारी आणि वनखात्याच्या ठाणे विभागाचे राज्य सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक लहुराज साबणे यांच्यासह २० जवानांचे पथक या मोहिमेत सहभागी झाले आहेत. (वार्ताहर)