शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

यात्रा बनल्या ‘त्यांच्या’ उदरनिर्वाहाचे साधन

By admin | Updated: February 14, 2016 02:56 IST

घरी शेती आहे, मात्र पाणी नाही, पोट कसं भरायचे हाच प्रश्न. बिगारी काम आणि सेंटरिंंगचे काम सुरू केले, मात्र मुकादम दोन-दोन महिने पैसेच देत नाही. शेवटी गाव सोडून कुटुंबासह कोकणात आलो.

-जयंत धुळप,  अलिबागघरी शेती आहे, मात्र पाणी नाही, पोट कसं भरायचे हाच प्रश्न. बिगारी काम आणि सेंटरिंंगचे काम सुरू केले, मात्र मुकादम दोन-दोन महिने पैसेच देत नाही. शेवटी गाव सोडून कुटुंबासह कोकणात आलो. पावसाळा संपल्यानंतर कोकणात देवांच्या मोठमोठ्या यात्रा भरतात. त्यात फुगे आाणि खेळण्यांचा धंदा करतो आणि कसेबसे पोट भरतो, अशी आपली जीवनकहाणी सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त उमदी गावातून बल्लाळेश्वराच्या माघी गणेशोत्सव यात्रेत व्यवसाय करण्यासाठी आलेल्या सुनील काळेने दिली.सह वर्षांपूर्वी दुष्काळ पडल्यावर कामधंदा, मजुरीचे काम मिळेल या आशेने काळे कुटुंब मुंबईत दाखल झाले. गोवंडीमध्ये सरकारच्या योजनेतून छोटेसे घरही मिळाले; पण कामधंदा नाही, खायचे काय, असा प्रश्न पडला. अखेर गोवंडीतील घर विकले. त्यातून आलेल्या पैशातून चायनीज खेळणी आणि फुगे घेऊन व्यवसाय सुरू केला. आता कोकणातील यात्रांमध्ये पारधी समाजातील १० - १२ जण मिळून व्यवसाय करीत असल्याचे काळे यांनी सांगितले. यात्रेच्या पूर्वी मुंबईतून चार ते १२ हजारांचा माल ते खरेदी करतात. एका यात्रेत तीन ते साडेतीन हजार मिळतात. कसाबसा खर्च भागत असल्याचे लखनदादा सांगतात.शासनाच्या पारधी समाजासाठी काही योजना आहेत, पण आम्ही पोटासाठी सतत फिरत असतो; गावात राहू शकत नाही. त्यामुळे योजनांचा लाभ घेता येत नाही. व्यवसायाकरिता सरकारने भांडवल देणारी योजना सुरू केल्यास पोटासाठी गाव सोडून बाहेर पडलेल्या शेकडो कुटुंबाना फायदा होईल, असे काळे सांगतात.पारधी समाजासाठी सांगली जिल्ह्यासाठी ४०० घरकुले मंजूर होती. त्यातील काही घरांचे जत तालुक्यात बांधकाम पूर्ण आहे. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात ४०, मिरज तालुक्यात १०८, जत तालुक्यात ३६६, तासगाव तालुक्यात १७, पलूस तालुक्यात ५, शिराळा तालुक्यात ४, आटपाडी तालुक्यात २७ अशी एकूण ५६७ पारधी कुटूंबे आहेत. परंतु दुष्काळ व अन्य कारणास्तव त्यातील अनेक कुटुंबे आपल्या गावात राहत नाहीत. या पारधी कुटुंबांची पोटासाठीची भ्रमंती थांबविणारी शासकीय योजना जोपर्यंत अमलात येत नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी माहिती या विषयातील अभ्यासक श्रमिक मुक्ती दलाचे राज्य समन्वयक सतीश लोंढे यांनी दिली.भटकंतीवरील पारध्यांचे सर्वेक्षण शक्यराज्यातील पारधी समाजाच्या पुनर्वसनाचा विषय अनेक वर्षांपासून रखडला आहे. पारधी समाज राज्यात अस्तित्वाने आहे, पण सरकारी नोंदीत कोठेही नाही. त्यांच्या समस्या, मागण्या प्रशासनासमोर असल्या तरी त्या सुटण्याचे मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून नाहीत. राज्यातील विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पारधी कुटुंबांचे सर्वेक्षण केल्यास नेमका तपशील समोर येऊन, त्यांच्या समस्या सोडविण्याचा नवा मार्ग सापडू शकेल, असा विश्वास पाली-सुधागड येथील जे. एन. पालीवाला महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. सुधीर पुराणिक यांनी व्यक्त केला आहे.आषाढ महिन्यात परतणार गावी पाली बल्लाळेश्वराची यात्रा आटोपून ही १० ते १२ पारधी कुटुंबे आता ठाणे जिल्ह्यातील बदलापूरकरिता रवाना झाली आहेत. त्यांनतर ही कुटुंबे महाड, चिपळूण आणि रत्नागिरी करत करत अखेरीस आषाढ महिन्यात आपल्या गावच्या मरूबाईच्या यात्रेस आपल्या गावी परतणार आहेत.