शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणमुक्तीसाठी उचलला संयुक्त विडा; रायगड जिल्हा परिषदेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 23:55 IST

कुपोषित बालकांवर उपचारासाठी सामंजस्य करार

रायगड : एकात्मिक बाल विकास प्रकल्प, रायगड जिल्हा परिषद, स्वदेस फाउंडेशन आणि आयपीसी (भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना) यांच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील म्हसळा, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर, महाड, माणगाव, सुधागड तालुक्यातील तीव्र व मध्यम कुपोषित बालकांच्या आरोग्यासंदर्भात उपचार करण्यासंबंधी सामंजस्य करार १६ डिसेंबर रोजी करण्यात आला.  त्यामुळे जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जाते.या करारावर रायगड जिल्हा परिषदेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, स्वदेस फाउंडेशनतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, आरोग्य विभागाचे मुख्य व्यवस्थापक डॉ. सुरेंद्र यादव, महाव्यवस्थापक तुषार इनामदार, व्यवस्थापक डॉ. सचिन अहिरे, सुधीर वाणी तसेच आयपीसीतर्फे डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी स्वाक्षरी केली.या सामंजस्य करारानुसार पुढील पाच वर्षांत कुपोषणमुक्त दक्षिण रायगड करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण स्वदेस फाउंडेशन अंगणवाडी सेविका, आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी हा प्रकल्प जिल्ह्यातील सात तालुक्यांतील कुपोषणमुक्तीसाठी वरदान ठरू शकेल, असा विश्वास व्यक्त केला.आयआयपीकडून मोफत सेवास्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी कुपोषणमुक्तीसाठी स्वदेस फाउंडेशनतर्फे सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आयआयपीचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी या कार्यक्रमासाठी आयआयपीकडून मोफत सेवा देणार असल्याचे सांगितले.बालरोगतज्ज्ञ संघटना तीव्र व मध्यम कुपोषित बालकांची मोफत तपासणी करणार  जिल्ह्यातील कुपोषण हद्दपार करण्यासाठी संयुक्तपणे उचललेला विडा कुपोषित बालकांसाठी संजीवनी ठरण्याची आशा आहे. यामध्ये भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना तीव्र व मध्यम कुपोषित बालकांची मोफत तपासणी करणार आहे.  जिल्हा परिषद आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास योजना यांच्या वतीने आवश्यक औषधोपचार करण्यात येणार आहेत. स्वदेस फाउंडेशन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणार आहे. कार्यक्रमासाठी स्वदेस फाउंडेशनचे संचालक राहुल कटारिया, डॉ. सचिन अहिर, सुधीर वाणी व पाणी व स्वच्छता विभागाचे जयवंत गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.