शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

दुरुस्ती केलेल्या सबमरीन केबल्सच्या जांइंटमध्ये पुन्हा एकदा बिघाड; ४ दिवसांपासून बत्ती गुल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2023 21:36 IST

ऐतिहासिक जगप्रसिद्ध घारापुरी बेटावरच्या कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला पुन्हा एकदा नादुरुस्तीचे  ग्रहण

-मधुकर ठाकूर

उरण : जागतिक ऐतिहासिक एलिफंटा बेटावर महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठ्याला पुन्हा एकदा नादुरुस्तीचे  ग्रहण लागले आहे.समुद्रातील दुरुस्ती केलेला सबमरीन केबल्सच्या जाइंटच्या बिघाडामुळे एलिफंटा बेटवासियांवर मागील चार दिवसांपासून अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

ऐतिहासिक जगप्रसिद्ध एलिफंटा बेटाला वीजपुरवठा करणाऱ्या समुद्राखालील उच्च दाबाच्या पाच विद्युत वाहिन्या २१ मे २०२२ रोजी नादुरुस्त होऊन निकामी झाली होती.त्यामुळे बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर ही तीनही गावे अंधारात बुडली होती. त्यानंतर महावितरणच्या तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर समुद्रातील नादुरुस्त झालेल्या सबमरीन केबल्सच्या जाइंटची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर एलिफंटा बेटावरील वीजपुरवठा मोठ्या प्रयासाने सुरळीत सुरू झाला होता.

समुद्रातील दुरुस्ती झालेल्या सबमरीन केबल्सच्या एका जाइंटमध्ये पुन्हा एकदा बिघाड झाला आहे. यामुळे मागील चार दिवसांपासून एलिफंटा बेटवासियांवर पुन्हा एकदा अंधारात चाचपडण्याची पाळी येऊन ठेपली आहे.वीजपुरवठा खंडित होत असल्याने बेटावरील पाणी पुरवठा करणारे विद्युत पंप बंद पडले आहेत.यामुळे तीनही गावातील पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.त्याचबरोबर दररोजच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे लघु उद्योजक, व्यावसायिकांनाही अनेक समस्यांना सामोरं जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

याबाबत महावितरणकडे घारापुरी ग्रामपंचायतीने महावितरणचे कार्यकारी अभियंत्याकडे लेखी तक्रार केली असल्याची माहिती सरपंच मीना भोईर यांनी दिली.तर नादुरुस्त केबल्सची अथवा  खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत आगाऊ माहिती महावितरणचे अधिकारी ग्रामपंचायतीला कधीच  देत नाहीत.त्यांचा बेटावर कर्मचारीही राहात नसल्याने माहितीही उपलब्ध होत नाही . महावितरणच्या या गळथान कारभार आणि दुर्लक्षपणामुळेच एलिफंटा बेटवासियांवर मागील चारपाच दिवसांपासून अंधारात चाचपडण्याची वेळ येऊन ठेपली असल्याची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

समुद्राखालील सबमरीन केबल्सच्या जांइंटची युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्यात आली होती.मात्र दुरुस्ती करण्यात आलेल्या केबल्सच्या जांइंटमध्ये पुन्हा एकदा बिघाड झाला आहे.यासाठी आवश्यक असलेले स्पेशल जाइंटचे मटेरियल उपलब्ध झाले आहे.जांइंट दुरुस्तीचे काम येत्या सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे.यामुळे पुढील आठवड्यात एलिफंटा बेटवासियांचा वीजपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.- देविदास बैकर. अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग

टॅग्स :electricityवीज