शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी उभारणार मॅनग्रोव्ह इको पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:34 IST

इको टुरिझम प्रकल्पासाठी पाच कोटींचा खर्च : तीन वर्षांत अंमलबजावणी

- मधुकर ठाकूर उरण : जेएनपीटी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या मॅनग्रोव्ह सेलच्या मार्गदर्शनाखाली मॅनग्रोव्ह इको पार्क विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. जेएनपीटीच्या बेलपाडा येथील मालकीच्या जागेत पाच कोटी खर्चाचा हा प्रकल्प दोन टप्प्यांत उभारण्यात येणार आहे. पर्यावरण-पर्यटन वाढविण्यासाठी आणि पर्यावरणाच्या जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी पर्यटक आधारित उभारण्यात येणाऱ्या इको टुरिझम प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार तयार करण्यात आला आहे.या प्रकल्पामध्ये इंटरप्रिटेशन सेंटर, पक्षी निरीक्षणासाठी वॉच टॉवर, पार्किंग, गार्डन, पर्यटकांसाठी रेस्टॉरंट, ब्लॉक टॉयलेट्स आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे जैवविविधतेवरील पर्यावरण-पर्यटन आणि शैक्षणिक क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार असून येत्या तीन वर्षांत हा प्रकल्प पर्यटकांसाठी खुला होईल, असा विश्वास जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी व्यक्त केला आहे.जेएनपीटीचे उद्दिष्ट फक्त आर्थिक सामर्थ्य प्राप्त करणे नाही, तर पर्यावरणीय आणि सामाजिक स्थिरतेवरदेखील लक्ष्य केंद्रित करणे आहे. अशा प्रकारे पर्यावरण संरक्षण जेएनपीटीच्या नियोजन आणि प्रचालनाचा अविभाज्य भाग राहणार असल्याचे सेठी यांनी सांगितले. जेएनपीटीची पर्यावरण व्यवस्थापन व निरीक्षण योजना (ईएमएमपी) सीएसआयआर-नीरी मुंबई यांनी तयार केली आहे आणि ईएमएमपीच्या नोडल अधिकाऱ्यांची या योजनेच्या अंमलबजावणीसाठी दरमहा आढावा बैठक घेतली जात असल्याची माहितीही सेठी यांनी दिली.दोन टप्प्यांत राबविणारयासाठी पाच कोटींचा खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. यामध्ये मॅनग्रोव्ह इको पार्क परिसरात वन्यजीवांच्या संवर्धन, संरक्षणासाठी आवश्यक प्रशिक्षण, माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच प्रकल्पासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे कामही करण्यात येणार आहे. पर्यावरण-पर्यटन वाढविणे आणि पर्यावरणाच्या जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी मॅनग्रोव्ह इको पार्क तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील वन विभाग, सरकार, मॅनग्रोव्ह सेल जेएनपीटीला मदत करणार आहेत.

टॅग्स :JNPTजेएनपीटी