शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

जेएनपीए बंदरांतील कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना १५ हजार रुपयांपर्यंत पगारवाढीचा करार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2023 16:33 IST

पगारवाढीच्या करारामुळे कामगारांना विविध सोयी-सुविधांसह १५ हजार रुपयांपर्यंत पगार वाढ मिळणार आहे.

मधुकर ठाकूर, उरण: जेएनपीए बंदरात पायलट,टगबोटींवर मे.एस.एच.एम. शिपकेअर कंपनीतील मे. टिमवर्क सिस्टीम या कंपनीच्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी पगारवाढीचा करार  करण्यात आला आहे.न्यू मॅरीटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या २०२३ ते २०२५ या तीन वर्षांसाठी झालेल्या पगारवाढीच्या करारामुळे कामगारांना विविध सोयी-सुविधांसह १५ हजार रुपयांपर्यंत पगार वाढ मिळणार आहे.

जेएनपीए बंदरात मागील अनेक वर्षांपासून पायलट, टगबोटींवर खलाशी आणि इतर पदांवर सुमारे ४० कामगार काम करतात. मे.एस.एच.एम. शिपकेअर कंपनीतील मे. टिमवर्क सिस्टीम या कंपनीच्या कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात कंपनीकडून टाळाटाळ केली जात होती. न्यू मॅरीटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार नेते महेंद्र घरत यांनी कामगारांना आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता.कंपनी विरोधात केलेला संघर्ष आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर वठणीवर आलेल्या व्यवस्थापनाने वेतनवाढीचा करार आणि कामगारांना आवश्यक सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मान्यता दिली. त्यानंतर न्यु मॅरीटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनीबरोबर २०२३ ते २०२५ या तीन वर्षांसाठी झालेल्या पगारवाढीचा करार करण्यात आला.या वेतनवाढीच्या करारामुळे कामगारांना ९००० ते १५००० पगारवाढ, १९५०० ते ३०००० बोनस, ३२ तासाचा अनुदान म्हणून एक्स्ट्रा पगार, मागील १४ वर्षाची ग्र्युजूईटी  मिळणार आहे. तसेच २ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, १ लाख रुपयांचा अपघात विमा, कामगारांना पीएफही सुरु करण्यात आले आहे.

 या करारनाम्याच्या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पी. के. रामण, कामगार प्रतिनिधी सुनील कोळी, यशवंत कोळी, अनिल कोळी, मोरेश्वर घरत, मितेश पाटील, दिनेश म्हात्रे, सगर घरत, जुबेर मास्टर आदि उपस्थित होते.

टॅग्स :uran-acउरण