शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

जेएनपीए साडेबारा टक्के भूखंडावर भरावासाठी मुरुम -माती ऐवजी फुकट मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रीजचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2023 20:47 IST

तारांकित प्रश्नावर सिडकोच्या अधिकाऱ्यांचे ठेकेदारांना वाचवण्याचा प्रयत्न: प्रकल्पग्रस्त संतप्त

- मधुकर ठाकूर 

उरण : सिडकोच्या अधिकाऱ्यांना जेएनपीए प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भुखंड वाटपासाठी सुरू असलेल्या १११ हेक्टर क्षेत्रातील भरावासाठी ठेकेदारांनी माती,मुरुम, दगडांऐवजी फुकट मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रीजचा मोठ्या प्रमाणावर वापर करून सिडको -जेएनपीएलाशेकडो कोटींचा चुना लावला आहे.याप्रकरणी विधानपरिषदेत लोकप्रतिनिधींनी तारांकित प्रश्न उपस्थित करताच चौकशी आधीच ठेकेदारांना वाचवण्यासाठी सारवासारव करून राज्य सरकारची दिशाभुल करण्याचा प्रयत्न सिडकोचे अतिरिक्त मुख्य अभियंता दीपक हरताळकर यांनी केला आहे.

सिडकोच्या अधिकाऱ्यांनी चालविलेल्या ठेकेदारांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या गलिच्छ प्रकारामुळे जेएनपीए प्रकल्पबाधित संतप्त झाले आहेतच.त्याशिवाय नुकत्याच झालेल्या जेएनपीएच्या बोर्ड ऑफ मिटिंगमध्ये सिडकोच्या या गैरप्रकाराचे तीव्र पडसाद उमटले आहेत.याप्रकरणी सिडकोच्या जांइंट एमडीशी तत्काळ बैठक बोलावून आयआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जेएनपीए अध्यक्ष संजय सेठी यांनी दिले आहेत.सिडकोने जेएनपीए बंदरासाठी नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, जसखार,सोनारी, बेलपाडा,पाणजे,डोंगरी, फुडें आदी गावातील सुमारे तीन हजार शेतकऱ्यांची २७०० हेक्टर जमीन संपादन केली आहे.संपादन केलेल्या जागेपोटी खातेदार असलेल्या तीन हजार शेतकऱ्यांच्या १२००० वारसांना जेएनपीएने ३४ वर्षांनंतरही साडेबारा टक्के विकसित भुखंडाचे वाटप केलेले नाही.भुखंड वाटपासाठी १४५ हेक्टर जमिनीचीआवश्यकता आहे.मात्र जेएनपीएने काही गावांना  गावठाण विस्तारासाठी जमिन दिल्याचे कारण पुढे करून साडेबारा टक्के विकसित भुखंड वाटपासाठी फक्त १११ हेक्टर जमीन जमीन आरक्षित केली आहे. 

 जेएनपीएने साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटप करण्यासाठी रांजणपाडा, जासई  दरम्यान आरक्षित करण्यात आलेल्या १११ हेक्टर क्षेत्रावर भराव सुरू केला आहे . या कामासाठी ३७९ कोटी रुपये खर्चाची तरतूदही करून सिडकोकडे सुपुर्द केले आहेत. जेएनपीएने निधी वर्ग केल्यानंतर भरावाचे काम सिडकोच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे.मात्र ठेकेदारांनी माती-मुरुम- दगडाच्या भरावाऐवजी चक्क मुंबई, नवीमुंबईतुन फुकटात मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रिजचा वापर केला आहे.हे टाकाऊ डेब्रिज फुकटात तर मिळतेच त्याशिवाय उलट एका डंपरमागे ३००- ते ४०० रुपये डेब्रिज टाकणाऱ्यांकडून दिले जातात.अशा प्रकारे ठेकेदारांनी एकीकडे सिडको-जेएनपीएकडुन भरावाचे तर दुसरीकडे फुकटात मिळणाऱ्या टाकाऊ डेब्रिजचा वापर आणि त्यापोटी मिळणारे पैसे अशी दुहेरी कमाई करुन कोट्यावधी रुपयांचा चुना लावला आहे. सिडको-जेएनपीए फसवणुक करून कोटींवधींची कमाई केली आहे.ही गंभीर बाब निदर्शनास आल्यानंतर आणि याविरोधात जेएनपीए  आणि संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींनंतर  भरावाचे काम सिडकोने मे २०२३  पासूनच बंद करण्यात आले आहे.

  सिडकोचे काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरदहस्तांनेच  ठेकेदारांनी चालविलेल्या गैरप्रकाराबाबत प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या तक्रारी आणि विविध वर्तमानपत्रातुन या गैरप्रकाराला वाचा फोडल्यानंतर काही जागरूक लोकप्रतिनिधींनी हा तारांकित प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला आहे.या प्रश्नावर खुलासा करताना सिडकोचे अतिरिक्त मुख्य अभियंता दिपक हरताळकर यांनी सारवासारव करून ठेकेदारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.त्यांनीचौकशी आधीच हे खरं नसल्याची चक्क लोणकडीच ठोकली आहे.या गलिच्छ प्रकारामुळे जेएनपीए प्रकल्पबाधित संतप्त झाले आहेतच.त्याशिवाय ३० नोव्हेंबर रोजी जेएनपीएच्या बोर्ड ऑफ मिटिंगमध्ये सिडकोच्या या गैरप्रकाराचे तीव्र पडसाद उमटले आहेत.याप्रकरणी सिडकोच्या जांइंट एमडीशी तत्काळ बैठक बोलावून आयआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जेएनपीए अध्यक्ष संजय सेठी यांनी दिले असल्याची माहिती जेएनपीए कामगार ट्र्स्टी रविंद्र पाटील यांनी दिली.

टॅग्स :cidcoसिडको