शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जीवाजी महाले यांची प्रतापगडावर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:34 IST

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक जीवाजी महाले यांची ३८२वी जयंती साजरी करण्यात आली. ‘होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी’ या म्हणीतून प्रखर राष्ट्रीय बाण्याचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे

पोलादपूर : किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक जीवाजी महाले यांची ३८२वी जयंती साजरी करण्यात आली.‘होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी’ या म्हणीतून प्रखर राष्ट्रीय बाण्याचा वारसा अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक शूरवीर जीवाजी महाले यांची अत्यंत दुर्मीळ तलवार, शिक्के, अप्रकाशित ऐतिहासिक कागदपत्रे तसेच शिवकालीन नाणी, तसेच साधने प्रथमच शिवभक्तांना, नागरिकांना किल्ले प्रतापगड भूमीत जीवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी ९ आॅक्टोबरला पाहावयासमिळाली.या वेळी शिवरत्न जीवाजी महाले यांचे अकरावे वंशज संतोष सकपाळ (महाले), इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे, मीनाक्षी भदाने, गोविंदराव पिंपळगांवकर, विनोद तावरे, नरवीर शिवा काशिद यांचे वंशज आनंदा काशिद आदी उपस्थित होते. प्रतापगडावर आयोजित करण्यात आलेल्या शूरवीर जीवाजी महाले यांच्या जन्मोत्सव सोहळ्यात महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आदी राज्यातील शिवभक्त सहभागी झाले होते.स्मारकाची मागणीकोल्हापूर येथील गिरीश नार्वेकर पथकाचे शिवकालीन मर्दानी खेळ पाहून सर्व शिवभक्त मंत्रमुग्ध झाले, अवघा शिवकाल डोळ्यासमोर या पथकांनी उभा केला. तसेच शिवव्याख्याते प्रदीप कदम यांनी जीवाजी महाले यांच्या चरित्रावर व्याख्यान दिले.या कार्यक्र मासाठी महाराष्ट्रभरातून नाभिक समाजाचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना तोलामोलाची साथ देणाºया वीर मावळ्यांचे वंशज सहभागी झाले होते.शिवरत्न जीवाजी महाले यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली.