शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषदेवर चौथ्यांदा निवडून जाण्याचा जयंत पाटील यांचा विक्रम,  कार्यकर्त्यांचे मानले आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:54 IST

आमदारांंचे मत मिळविणे फार कठीण आहे. ही निवडणूक एका वेगळ्या भूमिकेतून लढविण्यात आली आहे. या निवडणुकीची तयारी दीड वर्षापूर्वी केली होती. सर्वांच्या आशीर्वादामुळे निवडून आलो, त्यामुळे हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा आहे.

विशेष प्रतिनिधीअलिबाग : आमदारांंचे मत मिळविणे फार कठीण आहे. ही निवडणूक एका वेगळ्या भूमिकेतून लढविण्यात आली आहे. या निवडणुकीची तयारी दीड वर्षापूर्वी केली होती. सर्वांच्या आशीर्वादामुळे निवडून आलो, त्यामुळे हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा आहे. येणाऱ्या निवडणुकीत एक वेगळ्या भूमिकेतून काम करण्याची गरज आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचे पुरोगामी विचार या देशात, राज्यात जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.विधानपरिषदेवर चौथ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने येथील पीएनपी नाट्यगृहात पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आ. विवेक पाटील, आ. धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, शेकाप माजी जिल्हा सहचिटणीस शंकरराव म्हात्रे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नगरसेवक चित्रलेखा पाटील, माजी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकरी कामगार पक्षात शेतकरी, कष्टकरी, कामगार, गोरगरिबांच्या विचाराला व तत्त्वाशी बांधिलकी जपणारी मंडळी आहेत. अनेकांंचे प्रश्न त्याच ताकदीने, उमेदीने सोडविण्याचे काम सर्वांनी एकत्र येऊन केले आहे, त्यामुळे राज्यात शेतकरी कामगार पक्षाची एक वेगळी ताकद निर्माण केली आहे. गेली अनेक वर्षे विधिमंडळात प्रभावी आमदार म्हणून नेतृत्व केले आहे, त्यामुळेच राज्यात वेगळा दबदबा निर्माण करण्यात यश आल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमात माजी आ. विवेक पाटील आणि आ. धैर्यशील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते, माजी जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी या वेळी शेकापमध्ये प्रवेश केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप नाईक व आभार चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले.खोपोलीत ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागतखोपोली : महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सदस्य म्हणून बिनविरोध निवड झालेले आमदार जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर खोपोलीच्या प्रवेशद्वारावर शेकडोंच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात, फटक्याच्या आतशबाजीत जंगी स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र विधानपरिषदेत मी चौथ्यांदा प्रवेश केलाय, त्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. रायगड जिल्ह्याच्या समस्यांना अग्रक्र माने न्याय देण्याकडे लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी खोपोलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडPoliticsराजकारण