शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जनार्दन पाटील यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

By admin | Updated: February 14, 2017 04:56 IST

अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी अलिबाग

अलिबाग : अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी अलिबाग तालुक्यातील चेंढरे पंचायत समिती गणातून आपला उमेदवारी अर्ज देखील मागे घेतला आहे. त्यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी भाग पाडल्याचा आरोप जनार्दन पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्नी सुलभा पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळाली मात्र शेकापने देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पाटील यांची राजकीय गोची झाली होती. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे, असे असताना दोन्ही पक्षाने उमेदवार दिल्याने पेच निर्माण झाला होता. शेकापने प्रचाराला सुरुवातही केली होती. याबाबत तटकरे यांनी सांगितले होते मात्र त्यांना शेकापला रोखता आले नाही, असे पाटील यांनी सांगितले. प्रचार साहित्य तयार केले होते परंतु उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शेकापने माघार घेतली नाही. त्यामुळे पक्ष आणि पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.दोन्ही नेत्यांच्या राजकीय डावपेचामध्ये कार्यकर्त्यांचा बळी गेल्याचेही त्यांनी स्पष्ट करुन शिवसेना-काँग्रेसच्या बाजूने प्रचार करणार असल्याचे पाटील म्हणाले.