शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुरु ड समुद्रात ‘जय मल्हार’ बोट बुडाली, सर्व खलाशी सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:19 IST

मच्छीमारांना १ आॅगस्टपासून समुद्रात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी मुरूड शहरातील अरपेश जंजिरकर यांच्या मालकीची ‘जय मल्हार’ ही

आगरदांडा : मच्छीमारांना १ आॅगस्टपासून समुद्रात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी मुरूड शहरातील अरपेश जंजिरकर यांच्या मालकीची ‘जय मल्हार’ ही बोट मुरु ड समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. किनाºयापासून दीड किमी अंतरावर बोट पोहोचली असता, वादळी लाटांनी अचानक बोट बुडू लागली.बोटीमधील अमोल जंजिरकर, अरपेश जंजिरकर, भालचंद्र मकु, नितीन केंडु, नरेश वाघरे, नकेश पावसे, बाळू पाटील, ललित आगलावे, बाळकृष्ण आगलावे हे सर्व खलाशी यांनी समुद्रात उडी मारून किनारी आले. मात्र, तोपर्यंत ती बोट समुद्रात पूर्णत: बुडाली होती. येथील कोळी व भंडारी समाज बांधवानी सर्व एकत्र येऊन समुद्रात उड्या मारून दोरखंडाच्या सहाय्याने बोट खेचून बाहेर आणली. मात्र, या अपघातात लाखो रु पयांची जाळी व इतर वस्तुंचे नुकसान झाल्याने लाखोंचे नुकसान झाले.ओहटी असल्याने, तसेच खाडीमध्ये प्रचंड गाळ असल्याने, मच्छीमारांना नौका खाडीतून चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे बोटीला काढण्यास ६ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. ग्रोयस बंधारा असता, तर ही घटना घडली नसती. सरकारने या ठिकाणी ताबडतोब ग्रोयंस बंधारा बांधवा, अशी मागणी कोळी बांधवाकडून होत आहे.‘जय मल्हार’ बोटीनेच दोन वर्षांपूर्वी बुडालेल्या १४ विद्यार्थांना शोधण्याचे काम केले होते. एकदरा गावातील कोळी व भंडारी बांधव, सागर कन्या मच्छीमार सोसायटी, जय भवानी मच्छीमार सोसायटीचे सर्व कोळी बांधव यांनी सहकार्य केले. सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष मनोहर बैले व मनोहर मकु यांनी ग्रोयंस बंधरा बांधण्यासाठी मेरीटाइम बोर्डाकडे अनेक वेळा निवेदन दिले.