शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

असाही साजरा होतो वाढदिवस, महाडच्या 'सुमित'ने जपलंय सामाजिक भान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 20:45 IST

आपला वाढदिवस कसा साजरा करावा याच्या अनेक कल्पना आपण रोज पाहतो.

- जयंत धुळपअलिबाग  - आपला वाढदिवस कसा साजरा करावा याच्या अनेक कल्पना आपण रोज पाहतो. स्वतचा चेहरा बॅनरवर गल्लीत झळकावून काही जण तर कहरच करतात. परंतु आपल्या वाढदिवसानिमित्त एखाद्या आदीवासीवाडीवर जाऊन तेथील मुलांचे केस व्यवस्थित कापून देत त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहणे ही कल्पना म्हणजे निव्वळ परमार्थच. महाड शहरातील सुमित संजय पांडे याने यंदाही आपला वाढदिवस असाच साजरा केलाय. गेली तीन वर्ष हा उपक्रम सुमीतने चालू ठेवला आहे. गेल्या दोन वर्षे मोहोप्रे येथे त्याने आपला वाढदिवस असाच साजरा केला होता. 

आर्थिक परिस्थिती नसल्याने व वेळेअभावी आदिवासी मुलांचे पालक केस कापण्याच्या कृतीकडे दुर्लक्षच करतात. त्यामुळे त्वचेचे व केसांच्या आजाराला यांना सामोरे जावे लागते.  पेशाने नाभिक असलेल्या सुमित संजय पांडे या तरूणाने आपल्या वाढदिवसानिमित्त आज नाते जवऴील कोळोसे आदीवासीवाडीवर जाऊन तेथील आदिवासी मुलांचे केस कापून दिले. आज कोळोसे वाडीवर सकाळीच केस कापण्यासाठी लाईन लागली होती.सुमित पांडे हा तरूण येथील सर्व मुलांचे केस मोफत कापून देत होता. केस कापल्यावर मुलांना बिस्कीट व चाॅकलेट देऊन त्यांच्याशी गप्पाही मारत होता. सोबत त्याचे बंधू महेश मोरे देखील मुलांशी गप्पागोष्टी करत होते. आपल्या वडिलांचा हा सामाजिक सेवेचा वारसा सुमितने पुढे चालू ठेवला आहे. कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने संजय पांडे व महेश मोरे यांनी आदिवासी वाड्यांवर जाऊन मुलांचे केस कापून देण्याचा उपक्रम खूप वर्षापूर्वी सुरु ठेवला होता. सुमितने मात्र हा उपक्रम आपल्या वाढदिवसानिमित्त करून सामाजिक भान जपले असल्याबद्दल त्याचे सर्वत्र कोतुक होत आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचे हसू आणि आपल्याला मिळालेलं पूर्ण समाधान यामुळे सुमितचे आयुष्य सुखासमाधानाने बहरेल हे मात्र नक्की.