शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरूंना गाळे खाली करण्याची नोटीस

By admin | Updated: April 9, 2016 02:20 IST

तळा ग्रामपंचायत असताना विकासाचे दृष्टीने उत्पन्न फार कमी होते. तत्कालीन सरपंच बाळशेट दलाल यांचे कारकीर्दीमध्ये २० वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर पाच वर्षांच्या कराराने दिले

तळे : तळा ग्रामपंचायत असताना विकासाचे दृष्टीने उत्पन्न फार कमी होते. तत्कालीन सरपंच बाळशेट दलाल यांचे कारकीर्दीमध्ये २० वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर पाच वर्षांच्या कराराने दिले. मुदत संपल्यानंतर तोच करार पुन्हा नवीन करून १० ते २० टक्के भाडेवाढ करून त्याच दुकानदारांना तो दुकानगाळा दिला जात असे. मात्र जानेवारी २०१६ मध्ये तळा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले आणि तळा नगरपंचायत म्हणून अस्तित्वात आली. ३१ मार्च २०१६ला या दुकान गाळेधारकांच्या भाडेतत्त्वाच्या मुदती संपल्याने साधारणपणे १० मार्चला तळा नगरपंचायत प्रशासनाने दुकान गाळे भाडेधारकांना मुदत संपल्यामुळे गाळे खाली करण्यासंदर्भात नोटिसी दिल्या आहेत. या नोटिसी मिळाल्यानंतर सर्व दुकानदारांना पुढे काय, हा प्रश्न पडला आहे.भुुई भाडेकरू साधारणपणे ३५ असून, त्यांच्यापासून नगरपंचायतीला १ लाख ८० हजार रुपयाचे उत्पन्न मिळते तर दुकानगाळे भाडेकरू अंदाजे ४० असून त्यांच्यापासून वार्षिक उत्पन्न साधारणपणे ३ लाख मिळते. यांचा उदरनिर्वाह ही याच दुकानाच्या उत्पन्नावर चालतो, अशा परिस्थितीत नगरपंचायतीकडून दुकानगाळे खाली करण्याची नोटीस मिळालेने सर्वच भाडोत्री हवालदिल झाले आहेत. याबाबत गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष गणेश माणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही सर्व दुकानदारांनी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रेश्मा मुंढे व पदाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गुळवे यांना संघटनेतर्फे निवेदन देऊन दुकानगाळे पूर्वीच्याच भाडेकरूंना द्या. अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)