शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंतर्गत रस्त्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 01:32 IST

मुरुड नगरपरिषद हद्दीतील अंतर्गत रस्ते हे नवीन स्वरूपात बनवत असताना, २ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात आले होते.

नांदगाव/ मुरुड : मुरुड नगरपरिषद हद्दीतील अंतर्गत रस्ते हे नवीन स्वरूपात बनवत असताना, २ कोटी ३४ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, हे रस्ते तयार करताना निकृष्ट दर्जाचे बनवण्यात आले होते. याबाबत आपली योग्य ती कैफियत राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते यांनी आमदार सुनील तटकरे यांच्याकडे योग्य ती कागदपत्रे सुपूर्द केली होती.आमदार सुनील तटकरे यांनी चालू अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून शासनाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचे आदेश देऊन, जे कोणी अधिकारी व नगरसेवक दोषी आढळतील यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशानंतर या प्रकरणात गोवलेल्या सर्वांच्या अडचणीत भर पडली असून, चौकशी समितीसमोर त्यांना लवकरच हजर व्हावे लागणार आहे. आ. सुनील तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता, महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम ५५ अ व ५५ ब प्रमाणे मंत्र्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही चौकशी तीन महिन्यांत पूर्ण होणार असून, या चौकशी समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी असणार आहेत. या चौकशीत नगरपरिषदेत कर्मचारी तसेच नगरसेवक दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार असून, रीतसर कार्यवाही होणार आहे. आमदार म्हणून मी नगरपरिषदेसंदर्भात जे जे प्रश्न उपस्थित केले आहेत, यामध्ये या चौकशी समितीसमोर सर्व प्रश्नांची चौकशी होणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.>मुरु ड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर यांनी मुरु ड शहराच्या अंतर्गत रस्त्यात शंभर टक्के भ्रष्टाचार झाला असून, याबाबत आमदार तटकरे यांना आम्ही निवेदन दिलेले होते, त्याप्रमाणे तटकरे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून न्याय मिळवून दिला. या प्रकरणात गुंतविलेले अधिकारी वर्ग, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यावर चौकशी संपन्न झाल्यावर उचित कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.