शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या कारनाम्यांची चौकशी करा; आस्वाद पाटील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:08 IST

ॲड. आस्वाद पाटील यांनी जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सुधाकर माेरे यांच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. काेराेना कालावधीत आव्वाच्यासव्वा किमतीमध्ये साधन-सामग्रीची खरेदी आली अंगाशी

निखिल म्हात्रेअलिबाग : आराेग्य विभागाने काेराेनाच्या कालावधीत आव्वाच्यासव्वा किंमतीमध्ये साधन-सामग्री खरेदी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चाैकशी करावी अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ॲड. आस्वाद पाटील यांनी केली.रायगड जिल्हा परिषदेच्या ना.ना.पाटीस सभागृहात सर्वसाधरण सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. या सभेमध्ये अर्थ व बांधकाम सभापती निलीमा पाटील यांनी सन २०२१ -२२ चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सुरु असताना विविध सदस्यांनी आराेग्यांच्या प्रश्नांचा सभेमध्ये भडीमार सुरु केला. त्यावेळी आराेग्य विभागाचे कामकाज किती सुमार आणि चिड आणणारे आहे. हेच सर्व पक्षीय सदस्यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिले. त्यावेळी 

ॲड. आस्वाद पाटील यांनी जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. सुधाकर माेरे यांच्या कारनाम्याचा पाढाच वाचला. कोरोना कालावधीत जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. माेरे यांनी साडे सहा हजार रुपये किमतीची टेम्प्रेचर गन तब्बल १५ हजार रुपयांना खरेदी केली, तसचे आॅक्सीमीटर बाजारात ५०० रुपयांना मिळते ते डाॅ. माेरे यांनी अडिच हजार रुपयांना खरेदी केले आहे. यासह अन्य साधनांच्याबाबतीमध्ये तसेच झाले आहे. त्यामुळे डाॅ.माेरे यांच्या प्रकरणाची चाैकशी करावी अशी मागणी ॲड. पाटील यांनी केली.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या पथ दिव्यांचा वीजपुरवठा वीजमंडळाने खंडित केला असल्याने काळोखाचे साम्रज्य पसरले आहे.

याबाबत आजच्या सभेत सदस्यांनी जोरदार चर्चा घडवून आणली. काही व्यक्ती पथदिप वीजपुरवठा खंडित होण्याला जिल्हा परिषद सदस्य जबाबदार असल्याचे सांगून वृत्तपत्र आणि समाज माध्यमांवर जिल्हा परिषदेची बदनामी करीत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. पथदिव्यांच्या वीजदेयकांबाबत जिल्हापरिषदेचा संबंध नसताना काहीजण बदनामी करीत आहेत त्यामुळे अशी बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी काही सदस्यांनी केली. महाड तालुक्यातील शिरगाव ग्रमपंचायतीच्या सरपंचांनी अशाच प्रकारे जिल्हा परिषद सदस्यांबाबत वृत्त पसरवले असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सदस्यांनी केली. तसेच पथदिपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत काय उपाययोजना करण्यात येत आहेत याबाबतही विचारणा केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. किरण पाटील यांनी सविस्तर खुलासा केला.

आरोग्य केद्रांची दुरवस्थाजिल्ह्यातील प्रथमिक आरोग्य केद्रांच्या दुरावस्थेबद्दल महाडच्या सभापतींसह अन्य सदस्यांनी समस्या मांडल्या. आरोग्य अधिकारी आरोग्य केंद्रांतील सुविधांबाबत चालढकलपणा करीत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. इतर विषयांवरही या सभेत चर्चा झाली.