शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

उरण परिसरातील इंटरनेट सेवा कोलमडली, तहसील कार्यालयात कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 05:54 IST

मंगळवारपासून उरण परिसरातील एमटीएनएलची इंटरनेट सेवा पुरती कोलमडली आहे. इंटरनेट बंदचा फटका येथील शेकडो ग्राहकांबरोबरच उरण तहसील कार्यालयालाही बसला आहे.

उरण : मंगळवारपासून उरण परिसरातील एमटीएनएलची इंटरनेट सेवा पुरती कोलमडली आहे. इंटरनेट बंदचा फटका येथील शेकडो ग्राहकांबरोबरच उरण तहसील कार्यालयालाही बसला आहे. यामुळे शासकीय कामे ठप्प झाली आहेत.उरण परिसरातील इंटरनेट सेवा मंगळवारपासूनच ठप्प झाली आहे. केबल ब्रेक झाल्याने इंटरनेटसेवा कोलमडली असल्याची माहिती उरण एमटीएनएल कार्यालयातून देण्यात आली. मात्र, इंटरनेट सेवा कोलमडल्याने येथील सुमारे दीड हजार ग्राहकांना याचा फटका बसला आहे. इंटरनेट सेवा बंद असल्याने ग्राहकांसोबत हजारो इंटरनेटधारक व्यापाºयांची चांगलीच कोंडी झाली आहे. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचा सर्वाधिक फटका येथील तहसील व इतर शासकीय कार्यालयांना बसला आहे. माहिती आदान-प्रदान करण्याच्या कामात बाधा आली आहे. अशीच स्थिती उरणमधील इतर शासकीय कार्यालयांची झाली आहे.दोन दिवस एमटीएनएलची इंटरनेट सेवा बंद पडल्याने कामकाजावर परिणाम झाल्याची माहिती उरण नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.याबाबत उरण एमटीएनएल कार्यालयाकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. बुधवारी दुपारी इंटरनेट सेवा पूर्ववत होईल, असे सांगितले जात होते. मात्र, त्यानंतरही संध्याकाळपर्यंत तरी इंटरनेट सेवा पूर्ववत झाली नसल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त करण्यात आला आहे.