शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार कायद्यांविरोधात तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 01:01 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखला : रस्त्यावर ठिय्या देत अन्यायकारक कायदे रद्द करण्याची केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककासा : केंद्र सरकारच्या शेतकरी तसेच कामगार कायद्यांविरोधात मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी नाक्यावर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील शेतकरी, कामगारांनी आंदोलन केले. या वेळी अर्धा तास महामार्ग रोखला होता. यात तलासरी व डहाणू तालुक्यातील तीन ते चार हजार नागरिक सहभागी झाले होते.

अखिल भारतीय किसान सभा, शेतकरी, कामगारांनी देशव्यापी आंदोलन पुकारले होते. त्याचा एक भाग म्हणून चारोटी येथे अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी सकाळी ११ वाजल्यापासून शेतकरी, कामगार हातात लालबावटे घेऊन मोठ्या संख्येने डहाणू, तलासरी भागातून जमा झाले होते. या आंदोलनामध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.केंद्र सरकारने पास केलेले तीन शेतकरी कायदे रद्द करा, कामगार विधेयक रद्द करा, या प्रमुख मागण्यांबरोबरच विजबिल कायद्यातील बदल, वनाधिकारी कायद्याची अंमलबजावणी करा, खावटी कर्जासाठी मंजूर केलेली रक्कम महिलांच्या खात्यात जमा करा, रोजगार हमी योजना अंमलबजावणी करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या वेळी केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगारविरोधी धोरणाचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी महामार्ग अर्धा तास रोखून धरला होता. या वेळी आंदोलनकर्त्यांकडून हे कायदे मोठ्या भांडलवलदारासाठी फायद्याचे असल्याचे आरोपही करण्यात आले. या वेळी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, डहाणूचे आमदार विनोद निकोले, किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष बारक्या मांगात, सचिव रडका कलगडा व अनेक कार्यकर्ते हजर होते.मनोर : शेतकरीविरोधी विधेयके आणि वीजबिल कायद्यातील बदलांविरुद्ध शुक्रवारी मुंबई-अहमदाबाद महामार्ग चिल्हारफाटा येथे अखिल भारतीय किसान सभेतर्फे देशव्यापी प्रतिकार आंदोलन करण्यात आले. या वेळी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.जनता दल (से) उपोषण : विरार : केंद्र सरकारने कृषी विधेयकाचे रूपांतर कायद्यांत करून भारतातील सुमारे ९० टक्के शेतकऱ्यांना गुलामीत ढकलले आहे. कोरोनाकाळात घाईगडबडीत दोन्ही सभागृहांत हा कायदा संमत करून घेऊन संपूर्ण शेती क्षेत्र मूठभर भांडवलदार व्यापाऱ्यांना खुले केले आहे. याविरोधात जनता दल सेक्युलरच्या पालघर जिल्हाध्यक्ष प्रकाश लवेकर, प्रदेश सरचिटणीस मानवेल तुस्कानो, अरविंद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले होते.केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांसाठी लागू केलेले कायदे रद्द करावेत. तसेच स्थानिक वन, रोजगाराबाबतच्या समस्या तत्काळ सोडविल्या पाहिजे. अन्यथा, पुन्हा आंदोलन केले जाईल.- अशोक ढवळे, राष्ट्रीय अध्यक्ष, किसान सभातलासरीत बंदला१०० टक्के प्रतिसादतलासरी : केंद्राने बहुमताच्या जोरावर शेतकºयांना हमीभाव नाकारणारे, बाजार समित्यांचे अस्तित्व पुसणारे आणि शेतकºयांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारे विधेयक पारित केले आहे. केंद्राची ही भूमिका शेतकºयांच्या विरोधात आहे. त्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला तलासरीत १०० टक्के प्रतिसाद लाभला. शेतकरीविरोधी विधेयके आणि वीजबिल कायद्यातील बदलांविरुद्ध अखिल भारतीय किसान सभा, शेतकरी आणि कामगारांनी पुकारलेल्या देशव्यापी प्रतिकार आंदोलनाला तलासरीत १०० टक्के प्रतिसात मिळाला. तलासरी उधवा येथील बाजारपेठा पूर्ण बंद होत्या. बंददरम्यान तलासरी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला.