शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भरपाई टाळणाऱ्या विमा कंपनीला वठणीवर आणणार- सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 23:57 IST

आता बागायतदारांना नुकसानभरपाई मिळण्यातील अडचण दूर झाली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ओरिएंटल विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत आहे, तसेच विमाधारक शेतकºयांकडून पैशाची मागणीही करत असल्याने संबंधित अधिकाºयांना वठणीवर आणण्यात येईल, असा इशारा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिला.अलिबाग येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चक्रीवादळामुळे कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीची वाट न बघता ४०० कोटींची मदत दिली आहे. नारळ, सुपारी आणि कोकम या पिकांना नुकसानीच्या व्याख्येते आधी घेतले नव्हते. मात्र, त्यामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्दशनास आणून दिले. त्यानंतर, त्याबाबतचा सुधारित सरकारी निर्णय काढला. त्यामुळे आता बागायतदारांना नुकसानभरपाई मिळण्यातील अडचण दूर झाली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.मासेमारी व्यावसायिकांना नोव्हेंबर, २०१९ पासून विविध आपत्तीला तोंड द्यावे लागत असल्याने त्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यांच्यासाठी लवकरच विशेष आर्थिक पॅकेज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोल्ट्री व्यावसायिकांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या मदतीसाठीही सरकार मदतीचा हात पुढे करणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.>बैठकीत जाब विचारणाररायगड जिल्ह्यातील बागायतदारांनी आपल्या फळ झाडांचा विमा काढला होता. ओरिएंटल विमा कंपनी आता बागायतदारांची पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढत आहे.काही ठिकाणी विमा कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाºयांकडून परताव्याची रक्कम देण्यासाठी पैशाची मागणी केली जात आहे. शेतकºयांच्या बाबतीमध्ये अशी भूमिका घेणाºया ओरिएंटल विमा कंपनीस वठणीवर आणण्यात येईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाय योजना करण्यासाठी विशेष बैठक होणार आहे. त्या बैठकीत ओरिएंटल विमा कंपनीच्या अधिकाºयांना जाब विचारण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.>वन संपदेचे पंचनामे करणारनिसर्ग चक्रीवादळामुळे वन्य संपदेचेही आतोनात नुकसान झाले आहे. त्याबाबत वन विभागाने अद्याप पंचनामे केलेले नाहीत. त्यांनीही तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. निसर्ग वादळामध्ये सरकारी मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. त्या नुकसान भरपाईसाठी सरकारमार्फत पुढील आठ दिवसांमध्ये मदत येणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ