शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रोह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या अपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 01:01 IST

२६ गाव पाणीपुरवठा योजना निकामी

रोहा : तालुक्यातील पश्चिम खोऱ्यातील महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. या भागासाठी कार्यान्वित केलेल्या २६ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी या गावांना पोहोचत नाही. यामागची कारणे प्रशासन व लोकप्रतिनिधींना माहीत आहेत; मात्र त्यांच्याकडून हेतुपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे गावांना टँकरद्वारे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने तालुका प्रशासन या गावांना पाणीपुरवठा करण्यास सपशेल असफल ठरल्याचे चित्र आहे.पश्चिम खोऱ्यातील खारापटी ते धोंडखार २६ गाव पाणीपुरवठा योजना निकामी ठरत आहे. २०१४ मध्ये मंजूर झालेल्या या महत्त्वाच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे २०१९ पर्यंत पाणी सुरळीत सुरू होते. मात्र काही गाव, रस्त्यालगतच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ जोडणी केली. प्रारंभीच्या गावांना मुबलक पाणी तर दूरच्या धोंडखार, यशवंतखार, सानेगाव, शेणवई, झोळांबे, लक्ष्मीनगर अशा अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली. अनधिकृत जोडणीकडे संबंधित प्रशासन अधिकारी, स्थानिक पुढाऱ्यांनी कायम दुर्लक्ष केल्याने दूरच्या गावांची स्थिती अधिक बिकट झाली. आता निडी, खारापटी, धोंडखार, सानेगाव, यशवंतखार, झोळांबे, लक्ष्मीनगर, शेणवई, भातसई गावांच्या उंच भागात पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे योजनेतील असंख्य गावांमध्ये आज पाण्याची भीषणता जाणवत आहे. तीन-चार गावे वगळता अन्य गावांत पाणीच पोहोचत नाही. लक्ष्मीनगर झोलांबे वाडीतील पिण्याच्या पाण्यासाठी महिलांच्या डोक्यावरून उतरलेला पाण्याचा हंडा पुन्हा त्यांच्या डोक्यावर चढवला आहे. त्यासाठी लोकांना व जनावरांचे पाण्याविना हाल होत आहेत. येथे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावी अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.- रत्नदीप चावरेकर, लक्ष्मीनगर ग्रामस्थ